प्रहार शेतकरी, सहकार पॅनेलमध्ये थेट लढत

By admin | Published: September 8, 2015 12:12 AM2015-09-08T00:12:53+5:302015-09-08T00:12:53+5:30

तालुक्यात सहकार क्षेत्रात महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या बाजार समितीची निवडणूक १५ सप्टेंबर रोजी होत आहे.

Pahar farmers, directly fighting in the Co-operation panel | प्रहार शेतकरी, सहकार पॅनेलमध्ये थेट लढत

प्रहार शेतकरी, सहकार पॅनेलमध्ये थेट लढत

Next

राजकीय आखाडा : चांदूरबाजार कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक, दोन अपक्षही मैदानात
चांदूबाजार : तालुक्यात सहकार क्षेत्रात महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या बाजार समितीची निवडणूक १५ सप्टेंबर रोजी होत आहे. यासाठी प्रहार शेतकरी पॅनेल व सहकार पॅनेल रिंगणात आहेत. या दोन पॅनेलमध्ये थेट लढत होणार आहे. आपल्या विजयासाठी दोन्ही पॅनेलचे जेते व पदाधिकाऱ्यांनी थेट मतदारांशी संपर्क साधने सुरू केले आहे. प्रशासनाने या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेची पूर्ण तयारी केली आहे.
या बाजार समितीचे संचालक मंडळाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे मधंतरी शासनाने निवडणूक न घेत प्रशासनाची नियुक्ती केली होती. आता प्रशासक कारकीर्दीनेच निवडूक होत आहे. या निवडणुकीत आ. बच्च कडू यांचे नेतृत्वात प्रहार शेतकरी पॅनल रिंगणात आहे. या पॅनलतर्फे सेवा सहकारी संस्था मतदार संघाच्या सर्व साधारण गटात विलास अकोलकर, सहदेवराव इंगले, अशोक कसर, संदीप घुलक्षे, नवीनकुमार भोजने, सतीश मोहोड, अश्विन भेटाळू, महिला राखीवमध्ये मीरा राजाभाऊ किटकले, वर्षा दिलीप विघाते, इतर मागासवर्गीयमध्ये संतोष धर्माळे, विमुक्त भटक्या जमातीमध्ये प्रशांत श्रीकृष्ण उघडे, ग्रामपंचायत मतदार संघात सर्वसाधारण गटात योगिता मनोज जयस्वाल, विनोद दादाराव जवंजाळ, अनुसूचित जातीजमातीमध्ये सुभाष संपतराव मेश्राम, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामध्ये मंगेश बबनराव देशमुख, हमाल तोलारी मतदारसंघात सत्त्तार खाँ अब्दुल खाँ तर व्यापारी व अडते मतदारसंघात सौरभ महेश नांगलीया व अमित विजय भुजने मैदानात आहेत.
प्रहार शेतकरी पॅनल विरोधात जिल्हा बँकेचे अध्यक्ष बबलू देशमुख, राष्ट्रवादीच्या वसुधा देशमुख, भाजपचे प्रमोद कोरडे, शिवसेनेच्या सुरेखा ठाकरे यांच्या नेतृत्वात सहकार पॅनेल उभे आहे.
या पॅनेलमध्ये सेवा सहकारी संस्था मतदारसंघ सर्वसाधारण गटात प्रमोद घुलक्षे, सतीश रुपराव धोंडे, दिलीप देवीदास धोंडे, हरिभाऊ बोंडे, नंदकिशेर इंगळे, इंद्रप्रथा गजानन भुस्कटे, इतर मागासवर्गीय गटात अरविंद गुलाबराव लंगोटे, विमुक्त जाती भटक्या जमाती गटात विकास विक्रम शेकार, ग्रामपंचायत मतदारसंघातील सर्वसाधारण गटात अमर राजेंद्र चौधरी, मुकुंद शामराव मोहोड, अनुसूचित जाती जमाती गटात प्रमोद उत्तम धाकडे, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक गटात उमेश वासुदेव कोठाळे, हमाल तोलारी मतदार संघात गोपाल संपतराव सोनवने तर व्यापारी अडते मतदार संघातून मनोज नांगलीया व अमोल लंगोटे रिंगणात आहेत. तर या निवडणुकीत कैलस नामेदवराव तायवाडे यांनी सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण गटातून तर रमेश गणेशराव मोहोड यांनी ग्रामपंचायत अनुसूचित जाती/जमाती गटातून अपक्ष उमेदवारी दाखल केल्यामुळे मते विभाजनाची भिती व्यक्त करण्यात येत आहे. दोन्ही पॅनेलच्या नेत्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात असल्याने दोन्हीकडचे नेते व पदाधिकारी कार्यकर्त्यांसह कामाला लागले आहेत. (तालुका प्रतिनिधी)

१५७० मतदारांसाठी पाच गावांत ११ मतदान केंद्र
बाजार सिमतीच्या टीएमसी परिसरात केंद्र क्र १ वर सेवा सहकारी सोसाटीचे २०४ तर केंद्र क्र. २ वर ग्रामपंचायतीचे १८६ मतदार मतदान करू शकतील. ब्रा.थडी येथील केंद्र क्र. ३ व ४ नागनाथ विद्यालयात सेवा सहकारी चे १०२ तर ग्रा.पं.चे १३४ मतदार मतदार करतील. करजगाव शंकर विद्यालयात केंद्र क्र. ५ वर सेवा सह. चे ७२ तर केंद्र क्र. ६ वर ग्रा.पं. चे ७२ मतदार मतदान करु शकतील. तळेगाव (मो. ) गुणवंत बाबा विद्यालयात सेवा. स.चे. ८६ व ग्रा.पं.चे ९२, आसेगाव येथे सेवा सह. चे ७५ व ग्रा.पं.चे ९७ तर टी.एम.सी परिसरात अडते-व्यापारी २६० तर हमाल तोलारी चे १९० मतदाांची मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. १६ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता टी.एम.सी. परिसरात पाच टेबलावर मतमोजनी होईल, अशी माहिती निवडणूक अधिकारी अनिरुध्द राऊ त यांनी दिली.

Web Title: Pahar farmers, directly fighting in the Co-operation panel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.