इर्विनच्या अस्वच्छतेवर ‘प्रहार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 12:40 AM2017-08-27T00:40:10+5:302017-08-27T00:40:45+5:30

प्रहार पक्षातर्फे शनिवारी इर्विनच्या अस्वच्छतेवर वार करण्यात आला. आ.बच्चू कडू यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी इर्विन परिसरात स्वच्छता अभियान राबवून प्रशासनाला झोपेतून जागे केले.

'Pahar' on Irvine's indulgence | इर्विनच्या अस्वच्छतेवर ‘प्रहार’

इर्विनच्या अस्वच्छतेवर ‘प्रहार’

Next
ठळक मुद्देकर्मचाºयाचे निलंबन? : बच्चू कडूंसह कार्यकर्त्यांकडून स्वच्छता

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : प्रहार पक्षातर्फे शनिवारी इर्विनच्या अस्वच्छतेवर वार करण्यात आला. आ.बच्चू कडू यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी इर्विन परिसरात स्वच्छता अभियान राबवून प्रशासनाला झोपेतून जागे केले. यावेळी इर्विनची दुरवस्था चव्हाट्यावर आली होती.
जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरातील अस्वच्छतेसंदर्भात अनेकदा ताशेरे ओढले जातात. इर्विन प्रशासनाच्या निगरगट्ट भूमिकेमुळे अस्वच्छतेने कळस गाठला असून रुग्णांच्या आरोग्यालाच धोका निर्माण झाला आहे. ही स्थिती पाहता प्रहारने इर्विनच्या अस्वच्छतेवर शनिवारी वार केला. स्वच्छता अभियान राबवून आ.कडूंसह कार्यकर्ते स्वच्छतेच्या कामी लागले होते. अस्वच्छतेसोबतच परिसरातील दुर्गंधी पसरल्याचेही आ.बच्चू कडूंच्या लक्षात आले.
पाण्याच्या टाकीत झुरळ
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक श्यामसुंदर निकमसुध्दा उपस्थित होते. प्रहारचे काही कार्यकर्ते पाण्याच्या टाकीची स्वच्छता करण्यास गेले असता टाकीत झूरळ व सलाईनचे नळ्या आढळून आल्यात. टाकी स्वच्छ करण्याची जबाबदारी असणाºया रमेश जुमळे यांनी त्यांची जबाबदारी योग्यरीत्या पूर्ण न केल्याचे प्रहारच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी जुमळे यांना निलंबित करण्याची मागणी रेटून धरली. इर्विन रुग्णालयातील नाल्या कचरा व घाण पाण्याने तुंबल्याचे आ.कडूंना दिसले. यासंदर्भात त्यांनी अधिकाºयांना योग्य निर्देश देऊन नाल्या फोडून पाण्याचा निचरा होईल, अशी व्यवस्था करण्यास सांगितले. यावेळी प्रहारचे वसू महाराज, प्रदीप वडतकर, रोशन देशमुख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: 'Pahar' on Irvine's indulgence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.