काँग्रेसची भातकुली तहसीलवर धडक

By admin | Published: December 1, 2014 10:47 PM2014-12-01T22:47:23+5:302014-12-01T22:47:23+5:30

भकतकुली तालुका सरसकट दुष्काळग्रस्त घोषित करावा या मागणी साठी सागमवारी तालुका कॉग्रेस कमेटीच्या वतीने तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.

Pahatkuli of Congress hits the Tahsil | काँग्रेसची भातकुली तहसीलवर धडक

काँग्रेसची भातकुली तहसीलवर धडक

Next

अमरावती : भकतकुली तालुका सरसकट दुष्काळग्रस्त घोषित करावा या मागणी साठी सागमवारी तालुका कॉग्रेस कमेटीच्या वतीने तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.
भातकुली तालुक्यात यंदा पेरणी योग्य पावसाठी झालेला अतिविलंब ,दुबार,तिबार पेरणी, तथा पावसाचे अनियमिततेमुळे झालेली नापिकी ,लक्षात घेता सन १९७२ पेक्षाही दुष्काळी परिस्थतीत गंभीर आहे अशातच भातकुली तालुक्यातील सर्वगावाची आणेवारी ५० पैसेचे आत आहे.सोयाबिनचे प्रति एकर ३० किलो उत्पन्न झाले .त्यामुळे लागवडीचा खर्चही निघाला नाही .कापसाच्या पिकावरही मोठा प्रमाणात किडङ रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे .अशा परिस्थितीत शेतकरी आर्थीक संकटात सापडला आहे त्यामुळे भातकुली तालुक्यात सरसकट दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करीत कोरडवाहू शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रूपये, व ओलिताच्या शेतीला प्रति हेक्टर ५० हजार रूपये मदत दयावी अशा आशयाचे निवेदन भातकुली तालुका कॉग्रेस कमेटीच्या वतीने तहसिलदाराना देण्यात आले .यावेळी तालुका अध्यक्ष मुक्कदर खा पठाण, हरिभाऊ मोहोड, जि प सभापती सरिता मकेश्र्वर, अनिरूध्द पटर्वधन, विकास इंगोले, बबन औगड, चंदु औघड, बाळासाहेब देशमुख, अ शहेजाद अ रशिद, शफीमुल्ला वाहगन मुल्ला , अजय मोहने, सचिन पाध्ये, शे नदीम शे हूसेन, प्रविण भुगुल, प्रभाकर राऊत, संजय खर्चान, सैय्यद मुबिन, रामकृष्ण कळसकर, उमेश बोपले विनायक उके , म गालीब , यांच्यासह कॉग्रेस कमेटीचे पदाधिकारी उपस्थित होते .

Web Title: Pahatkuli of Congress hits the Tahsil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.