पालिका, नगरपंचायत क्षेत्रात विनामास्क वावरणा-यांना दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:07 AM2021-02-19T04:07:24+5:302021-02-19T04:07:24+5:30
पान २ ची लिड वरूड-मोर्शी : जिल्ह्यातील वरूड व मोर्शी पालिका व धारणी नगरपंचायत क्षेत्रात मास्क न वापरणा-यांविरूद्ध कारवाईचा ...
पान २ ची लिड
वरूड-मोर्शी : जिल्ह्यातील वरूड व मोर्शी पालिका व धारणी नगरपंचायत क्षेत्रात मास्क न वापरणा-यांविरूद्ध कारवाईचा धडाका सुरू करण्यात आला. कोरोनाचे संभाव्य वाहक असणा-यांच्या खिशाला कात्री लावण्यात आली. ती मोहीम अधिक वेगाने राबविण्याची गरज असताना अन्य पालिका क्षेत्रात कारवाई केव्हा, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा रोज नवनवे उड्डाणे घेत असताना, अमरावती शहर वगळता पालिका, नगरपंचायत व तालुका मुख्यालयी महसूल व अन्य यंत्रणांच्या कारवाईला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही.
जिल्ह्यासह तालुक्यातील शासकीय कार्यालये, बँकामध्ये नागरिकांचा मुक्त संचार सुरू असून, ना थर्मल स्क्रिनिंग, ना सॅनिटायझर अशी अवस्था आहे. नागरिक विनामास्क गर्दीच्या ठिकाणी बिनधास्त संचार करीत आहेत. एकीकडे कोरोनाचा कहर तर दुसरीकडे धुमधडाक्यात विवाह समारंभाची लयलूट सुरू आहे. जिल्हाधिका-यांच्या जमावबंदीच्या आदेशाला हरताळ फासला जात आहे. दरम्यान, वरूड नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाच्यावतीने बुधवारी विनमास्क फिरणा-या ६० जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. त्यांचेकडून करून ३ हजार ५०० रुपये दंड वसूल केला. ही मोहीम अविरत सुरू राहणार असल्याचे मुख्याधिकारी रवींद्र पाटील यांनी सांगितले.
बॉक्स
बँका, शासकीय कार्यालयातून थर्मल स्क्रिनिंग हद्दपार !
शहरासह तालुक्यातील बँक, शासकीय कार्यालयात थर्मल स्कॅनिंग करणे बंदच झाले तर बँकामध्ये अधिकारी, कर्मचारी स्वत:ला सुरक्षित ठेवत असले तरी ग्राहकांसाठी साधे सॅनिटायझरही नाही. गर्दीच्या ठिकाणी बिनधास्त संचार सुरू असतो. ५० टक्के उपस्थितीचासुद्धा फज्जा उडाला आहे. कोरोना पॉझिटिव्ह निघालेले रुग्ण गृह विलगीकरणामध्ये ठेवून त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग बंदच झाल्याने एकापासून दुस-याला लागण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
--------------
फोटो पी १८ मोर्शी
मोर्शीच्या आठवडी बाजारातून मास्क हरविला
मोर्शी : कोरोना ग्रस्तांच्या दर दिवशीच्या वाढत्या संख्येचा नागरिकांवर काहीही परिणाम झालेला नाही. मोर्शी शहरातील मंगळवारच्या आठवडी बाजारातील गर्दी त्याचे द्योतक आहे. ग्राहक व दुकानदार मास्क लावत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे मोर्शी शहरात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तालुक्यातील सर्वात मोठा बाजार म्हणून शहरातील या आठवडी बाजाराची ओळख आहे. संपूर्ण जिल्ह्यातून शेकडोंच्या संख्येने भाजीविक्रेते व इतर व्यावसायिक या आठवडी बाजारात येत असतात. गर्दीच्या ठिकाणी संसर्ग पसरण्याची भीती असल्याने जिल्ह्यामध्ये १४४ कलम लागू केली आहे. यानुसार या आठवडी बाजारात गर्दी होणार नाही याची दक्षता प्रशासनाने घेणे गरजेचे आहे. मात्र नागरिकांना कुठलीही भीती नसून आठवडी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.
----------------------------
फोटो पी मोशी मास्क फोल्डर
मोर्शीचा जयस्तंभ चौक ‘टार्गेट’
दंडवसुली : पोलीस, पालिकेची संयुक्त कारवाई
मोर्शी : स्थानिक नगर पालिकेच्या बुधवार बाजारपेठेमध्ये विनामाास्क फिरणा-या नागरिकांना समज देण्यात आली. काही व्यापा-यांकडून दंड वसूल करण्यात आला. गुरुवारपासून ही मोहीम आणखी तीव्र करण्यात आली. येथील बस स्थानक व जयस्तंभ चौक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या झुंडीच्या झुंडी उभ्या असतात. त्यामुळेसुद्धा कोरोना पसरण्याची भीती निर्माण झाली. त्याअनुषंगाने नागरिकांमध्ये जागरूकता यावी याकरिता मुख्याधिकारी गीता ठाकरे या जयस्तंभ चौक तसेच बाजारपेठेत फिरल्या. व्यापारी व नागरिकांना समज दिली. दंड वसूल केला. ज्या नागरिकांकडे मास्क नव्हता त्या नागरिकांना मुख्याधिका-यांनी मास्कसुद्धा वितरित केले.
-------------------
फोटो पी १८ धारणी मास्क फोल्डर
धारणीत पोलिसांकडून मोफत मास्क
दंडासोबतच जनजागृती : शहरातील मुख्य चौकात कारवाई
धारणी : शहरात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरिता जिल्हाधिकाºयांकडून प्राप्त आदेशानुसार विनामाक्स व कोरोना नियमावलीचे उलंघन करणाºयांविरूद्ध पोलीस व नगरपंचायत प्रशासनाने गुरूवारपासून धडाक मोहिम हाती घेतली आहे.
तालुक्यात आतापर्यंत ३९५ कोरोना रुग्णाची नोंद झाली आहे. पैकी ४८ जण अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. त्याअनुषंगाने शहरातील जयस्तंभ चौक, दयाराम चौक, होली चौक, बसस्टँड परिसरात पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी, पीएसआय सुयोग महापुरे यांच्यासह पोलीस कर्मचारी चंद्रशेखर पाठक, प्रमोद बाळापुरे, प्रदीप गणेशे, अरविंद सरोदे, रविंद्र वºहाडे, बंडू चक्रे, नगरपंचायतचे लेखाधिकारी आशिष पवार, अभियंता आकाश गैलवार, बबलू शेख, उमेश मालवीय यांनी दंडात्मक कारवाई तर, ठाणेदार विलास कुलकर्णी यांनी त्यांच्या शासकीय वाहनात माईक लावून संपूर्ण शहरात जनजागृती केली. स्वत: मास्क विकत घेऊन नागरिकांच्या चेहºयाला मास्क लावून दिले.
------------