तालुक्यातील पांदण रस्ते बनले भष्टाचाराचे कुरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:14 AM2021-05-21T04:14:41+5:302021-05-21T04:14:41+5:30
फोटो पी २० वरूड पाणी वरूड् : तालुक्यात पालकमंत्री पांदण योजनेतून अनेक कामे मंजुर असुन मातीकाम सुरू ...
फोटो पी २० वरूड पाणी
वरूड् : तालुक्यात पालकमंत्री पांदण योजनेतून अनेक कामे मंजुर असुन मातीकाम सुरू आहे. काही पांदण रस्त्याचे खडीकरण सुरु असून यामध्ये सावळागोंधळ असल्याची खमंग चर्चा आहे. सदर कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप असताना एकीकडे मजुरांच्या हाताला काम नाही तर दुसरीकडे ठेकेदार मशीनद्वारे काम करून देयके काढत आहेत.
पांदण रस्ते अत्यंत खराब झाल्याने पावसाळयात बैलबंडी, शेतमजुरांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यानुसार तालुक्यात १४० पांदण रस्ते मंजूर करण्यात आले. पैकी ७० पांदण रस्त्याचे माती काम सुरू आहे. परंतु मातीकाम मशीनद्वारे करून रात्रीचा दिवस करून ओबडधोबड पांदण रस्ते तयार केल्याने पावसाळ्यात शेतकर्याना त्रास होण्याची शक्यता वर्तविण्यात येते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत हे कामे सुरु असून अधिकाऱयांचे दुर्लक्ष आहे. पांदण रस्त्याचे कामात मोठया प्रमाणात भष्टाचार होत असल्याची ओरड आहे.
कोट १
तालुक्यात पावसाळ्यापूर्वी पांदण रस्ते करणे गरजेचे असल्याने मातीकाम करून पांदण रस्ते सुरु आहेत. ते मशिनद्वारे केले जाते. १४० पांदण रस्ते मंजूर असून ६० ते ७० पांदण रस्त्याचे मातीकाम सुरु आहे . खडीकरण सुरु असणारे पांदण रस्ते तीन चार असून ते २०१८ मधील असून रोजगार हमी योजनेतील मजूरांकडून काम करणे आवश्यक आहे
एकनाथ तळेले, उपविभागीय अभियंता, साबांवि