पंढरी प्रकल्प लवकरच पूर्णत्वास जाणार

By admin | Published: June 4, 2016 12:07 AM2016-06-04T00:07:37+5:302016-06-04T00:07:37+5:30

तालुक्यातील बांधकामाधीन असलेल्या प्रकल्पाची आ.अनिल बोंडे यांच्यासमवेत विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर विभागाचे कार्यकारी संचालक ए.व्ही.सुर्वे यांनी पंढरी,

Pandharpur project will be completed soon | पंढरी प्रकल्प लवकरच पूर्णत्वास जाणार

पंढरी प्रकल्प लवकरच पूर्णत्वास जाणार

Next

जून २०१७ पर्यंत होणार पूर्ण : विदर्भ पाटबंधारे विभागाने केली पाहणी
वरुड : तालुक्यातील बांधकामाधीन असलेल्या प्रकल्पाची आ.अनिल बोंडे यांच्यासमवेत विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर विभागाचे कार्यकारी संचालक ए.व्ही.सुर्वे यांनी पंढरी, पाक, भेमडी (लहान), नागठाणा -२, चांदस (वाठोडा), झटामझिरी, पवनी, बहादा प्रकल्पाचा दौरा करून संबंधित अधिकाऱ्यांना बांधकामाधीन प्रकल्पाबाबत सूचना देऊन निर्देशित केले.
यावेळी कार्यकारी संचालक म्हणाले की, जून २०१७ पर्यंत पंढरी प्रकल्पाचे काम पूर्णत्वास जाणार आहे. या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात जलसाठवण केलीजाईल. त्यासोबतच या कालव्यातील पाणी पाईपलाईनने शेतकऱ्यांना देण्याचे नियोजन करून तसेच खापरखेडा येथील ५२ पुनर्वसित कुटुंबांना खराडा येथे स्थलांतरित करून त्यांच्या सुख-सुविधेची कामे पूर्ण करण्याचे आश्वासनसुद्धा यावेळी सुर्वे यांनी दिले. आ.अनिल बोंडे हे मतदारसंघाच्या विकासासाठी नेहमी अग्रेसर असतात. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ विभाग नागपूरचे कार्यकारी संचालक ए.व्ही.सुर्वे यांना बांधकामाधीन असलेल्या प्रकल्पाची पाहणी करून या प्रकल्पांना तत्काळ पूर्णत्वास नेण्यासाठी आमंत्रित केले होते. आ.अनिल बोंडे यांच्या निमंत्रणाला मान देऊन गुरुवारी २ जून रोजी वरुड तालुक्यातील पंढरी, पाक, भेमडी (लहान), नागठाणा -२, चांदस (वाठोडा), झटामझिरी, पवनी, बहादा येथे सुरू असलेल्या बांधकामाधीन प्रकल्पाचा पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रकल्पाबाबत अधिक सूचना देऊन हे प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्देश दिले. सर्वप्रथम कार्यकारी संचालक यांनी चांदस वाठोडा प्रकल्प तसेच पंढरी प्रकल्प, नागठाणा-२ प्रकल्प, झटामझिरी प्रकल्प, भेमडी लहान प्रकल्प, पाक प्रकल्प, पवनी प्रकल्प व बहादा प्रकल्पाची पाहणी केली.
पंढरी प्रकल्पाचे काम जून २०१७ पर्यंत पूर्ण होणार असून या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात जलसाठा केला जाईल. तसेच ज्या-ज्या ठिकाणी शक्य आहे, त्या-त्या ठिकाणी कालव्यातून पाईपलाईन द्वारे शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी पाणी देण्याचे नियोजन केले जाणार आहे. यासोबतच पंढरी प्रकल्पालगत असलेल्या पुनर्वसित खापरखेडा गावातील ५२ कुटुंबांना खराडा येथे स्थलांतरित करून पुनर्वसित कुटुंबांना सुख-सुविधा तत्काळ उपलब्ध करून द्यावी, कालव्याची कामे प्रधाण्यानी पूर्ण करून जून २०१८ पूर्वी करण्याचे नियोजन करून पुढील काळात ८ हजार ३७० शेतकऱ्यांच्या शेतात सिंचनाचा लाभ मिळेल.
या प्रकल्पावरून पुसला व वरुड गावांना पाईपलाईनद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याचे नियोजन केले जाईल, असे आश्वासन ए.व्ही.सुर्वे यांनी उपस्थितांना दिले. यावेळी आ.अनिल बोंडे यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने आपली भूमिका स्पष्ट करीत त्यांच्या समस्या कार्यकारी संचालक यांच्याकडे व्यक्त केली. प्रकल्पासंबंधित समस्या निकाली काढून हा प्रकल्प जून २०१७ पर्यंत पूर्णत्वास जाण्याचे हमी दिली. यामुळे प्रकल्प भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाईपलाईनद्वारे पाणी मिळणार असल्याने शेतकरी एवढ्यावरच खुश न होता त्याला शासनाकडून पुरेपूर लाभ मिळवून देण्याची हमीसुद्धा त्यांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Pandharpur project will be completed soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.