चांदूर रेल्वेत ‘पाणीबाणी’ दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 06:27 PM2020-05-11T18:27:50+5:302020-05-11T18:30:12+5:30

कोरोनाच्या दाहकतेपुढे उन्हाळ्याच्या दाहकताही जाणवत नसल्याचे चित्र असताना, शहरातील अनेक गृहिणींना भर उन्हात नळाचे पाणी भरावे लागत आहे. सकाळी ११ ते २ या वेळेत अनेक गृहिणी रखरखत्या उन्हात पालिकेच्या सार्वजनिक नळावर पाणी भरत आहेत. नगर परिषदेमार्फत दिवसाआड शहराला एक तास पाणीपुरवठा होतो. परंतु, भर दुपारी नळ सोडले जातात.

'Panibani' ignored in Chandur Railway | चांदूर रेल्वेत ‘पाणीबाणी’ दुर्लक्षित

चांदूर रेल्वेत ‘पाणीबाणी’ दुर्लक्षित

googlenewsNext
ठळक मुद्देगृहिणींना भर उन्हात भरावे लागते पाणी : प्रशासकीय यंत्रणा कोरोनात व्यस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर रेल्वे : महिना-दीड महिन्यांपासून देशात कोरोनाचा कहर सुरू आहे. वरूडमधील पॉझिटिव्ह महिलेच्या संपर्कात आलेल्या येथील एका कुटुंबाचे थ्रोट स्वॅब घेण्यात आले. त्यामुळे चांदूर रेल्वे शहरातही कोरोनाची दहशत पाहावयास मिळाली. अख्खी महसूल व नगरपालिका यंत्रणा कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सज्ज असताना, शहरातील पाणीबाणीची स्थिती दुर्लक्षित झाली आहे.
कोरोनाच्या दाहकतेपुढे उन्हाळ्याच्या दाहकताही जाणवत नसल्याचे चित्र असताना, शहरातील अनेक गृहिणींना भर उन्हात नळाचे पाणी भरावे लागत आहे. सकाळी ११ ते २ या वेळेत अनेक गृहिणी रखरखत्या उन्हात पालिकेच्या सार्वजनिक नळावर पाणी भरत आहेत.
नगर परिषदेमार्फत दिवसाआड शहराला एक तास पाणीपुरवठा होतो. परंतु, भर दुपारी नळ सोडले जातात. काही भागात महिलांना सकाळी घरातील कामे करून दमल्यानंतर भर उन्हात पुन्हा पाणी भरण्याच्या दिव्यास सामोरे जावे लागते. याविषयीची पाणीपुरवठा कर्मचारी यांच्याशी संपर्क केले असता, दिवसभरात संपूर्ण शहराला तासभर पाणीपुरवठा करावा लागत असल्याने दिवसभरात प्रत्येक तासाला नळ सोडावेच लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
शहरातील महारूद्रनगर, नेहा कॉलनी अशा अनेक वसाहतींमध्ये पाण्याचा कृत्रिम तुटवडा जाणवत आहे. शहरातील काही भागातील पाइप लाइन नादुरुस्त असल्याने पाण्यासाठी ओरड होत आहे. दुसरीकडे नगर परिषदेचे कर्मचारी कोरोनाच्या लढाईत व्यस्त असल्याने पाणीपुरवठ्याकडे दुर्लक्ष होत असल्याचेही यानिमित्त पाहायला मिळत आहे.

भर उन्हात पाणी भरणे त्रासदायक आहे. चार दिवसांनंतर आपण पाणीपुरवठा करीत आहोत. त्यामुळे दिवसभर पाणीपुरवठा करावा लागत आहे. त्यात बदल केल्यास पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडेल.
-वैभव गायकवाड, नगरसेवक

सध्याच्या पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकाची माहिती घेते आणि भर दुपारी न सोडता त्यात काही बदल करता येईल का, यासंदर्भात कर्मचाऱ्यांशी चर्चा करून वेळापत्रकात बदल करण्याचा प्रयत्न करू.
-मेघना वासनकर मुख्याधिकारी

भर दुपारी उन्हामध्ये पाणी भरणे हे दिव्यच आहे. पाणीपुरवठा सभापती या महिला आहेत. त्यांनी महिलांचा प्रश्न समजून घेऊन उन्हाची वेळ टाळून पाणीपुरवठा करणे गरजेचा आहे.
-बच्चू वानरे, नगरसेवक

Web Title: 'Panibani' ignored in Chandur Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.