विद्यापीठ परिसरात बिबट्याची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 09:50 PM2018-09-13T21:50:15+5:302018-09-13T21:51:15+5:30

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसरात बिबट आणि सापांचा संचार असल्याने तेथील वसतिगृहातील विद्यार्थिनींना एकटीने बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. गत आठवड्यात वसतिगृह परिसरातील रस्त्यावर एका सापाने काही वेळ ठिय्या दिला होता, हे विशेष.

Panic Panic in University area | विद्यापीठ परिसरात बिबट्याची दहशत

विद्यापीठ परिसरात बिबट्याची दहशत

Next
ठळक मुद्देवसतिगृहातील विद्यार्थिंनीना बाहेर जाण्यास मज्जाव : नगरसेविकेच्या घरातील कुत्र्याची शिकार

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसरात बिबट आणि सापांचा संचार असल्याने तेथील वसतिगृहातील विद्यार्थिनींना एकटीने बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. गत आठवड्यात वसतिगृह परिसरातील रस्त्यावर एका सापाने काही वेळ ठिय्या दिला होता, हे विशेष.
विद्यापीठात मुलींची तीन वसतिगृहे आहेत. वसतिगृह परिसरात दाट झाडी आहे आणि मोठा नाला वाहतो. बिबट अधूनमधून कुत्र्यांचा पाठलाग करीत वसतिगृहाच्या मेस परिसरात धडकला आहे. काही दिवसांपासून सायंकाळ वा रात्री बिबट येत असल्याची माहिती वसतिगृह रक्षकाने ‘लोकमत’ला दिली. त्यामुळे विद्यार्थिनींना विशेषत: सायंकाळी मेसमध्ये जेवणासाठी तीन किंवा चार अशा समूहाने जाण्याबाबत सूचना वसतिगृह प्रशासनाने दिल्या आहेत.
नाला परिसरातून विद्यापीठाची भिंत ओलांडून बिबट मार्डी मार्गातील लोकवस्तीत शिरत असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. बिबट्याने नगरसेविका प्रमिला जाधव यांच्याकडील कुत्र्याची शिकार काही दिवसांपूर्वीच केली तसेच मार्डी मार्गालगतच्या पेट्रोल पंपजवळील एका गोठ्यातून सहा दिवसांच्या वासराची शिकार करून ते झाडावर नेले होते.

नजीकच्या वनक्षेत्रातील बिबट कुत्र्यांच्या शिकारीसाठी विद्यापीठात येतात. बिबट व सापांची भीती असल्याने विद्यार्थिनींना एकटे बाहेर जाण्यास मज्जाव केला. त्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.
- स्वाती शेरेकर, अधीक्षक, मुलींचे वसतिगृह.

Web Title: Panic Panic in University area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.