चिखलदºयात काश्मीरचा नजारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 12:47 AM2017-08-31T00:47:09+5:302017-08-31T00:47:59+5:30

विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळावर निसर्गाच्या जादुई आविष्काराचा अद्भूत नजारा येथे येणाºया हजारो पर्यटकांना मोहित करीत आहे.

Panoramic view of Kashmir | चिखलदºयात काश्मीरचा नजारा

चिखलदºयात काश्मीरचा नजारा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळावर निसर्गाच्या जादुई आविष्काराचा अद्भूत नजारा येथे येणाºया हजारो पर्यटकांना मोहित करीत आहे.
चिखलदरा पर्यटन स्थळावर पहिल्यांदा पावसाने तब्बल दोन महिने उशिरा हजेरी लावलीे. पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न उद्भवला असताना मागील पाच दिवसांपासून कोसळणारा पाऊस दिलासा देणारा ठरला आहे.
जून, जुलै या दोन महिन्यांत तब्बल ५२ हजार पर्यटकांनी हजेरी लावली असून आॅगस्ट महिन्यात गणपती, पोळा आदी सणांमुळे संख्या रोडावली आहे. अशातच बेपत्ता झालेला पाऊस आल्याने कालपर्यंत कोरडे पडलेले नदी, नाले आणि पॉईन्टवरील धबधबे चिखलदºयाची शान वाढवू लागले आहेत.

निसर्गाने रंग उधळले :
विदर्भाच्या नंदनवनाचे मनोहारी दृश्य

धुक्यांचा पूर चिखलदºयाच्या दºया-खोºयात शुभ्र धुके समुद्राच्या लाटाप्रमाणे भासू लागले आहे. हे चित्र डोळळ्याचे पारणे फेडणारे ठरले आहे. दिवसा पर्यटकांनी आपली वाहने लाईट लावून चालवावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. घाटवळण्याचा नागमोडी रस्ता, हिरवीगार वनराई, पहाडातून झिरपणारे पाणी पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले आहेत.

पावसाची दमदार हजेरी
चिखलदरा पर्यटन स्थळावर दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असून २९ आॅगस्टपर्यंत ९२० मि.मी. पावसाची नोंद झाली होती. गतवर्षी १,१७७ मि.मी. पाऊस कोसळला होता. चिखलदरा तालुक्यात चिखलदरा ४० मि.मी., टेब्रुसोंडा २० मि.मी. सेमाडोह १८ मि.मी. चुर्णी ४० मि.मी. पावसाची नोंद झाल्याची माहिती तहसीलदार प्रदीप पवार यांनी दिली.

Web Title: Panoramic view of Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.