पानपिंपरी उत्पादक शेतकरी अनुदानापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:13 AM2021-04-20T04:13:10+5:302021-04-20T04:13:10+5:30

उपासमारीची पाळी : विभागीय स्तरावरील समिती केव्हा होणार? अंजनगाव सुर्जी : सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या अमरावती, अकोला, बुलडाणा या जिल्ह्यांमध्ये ...

Panpimpri growers deprived of subsidy | पानपिंपरी उत्पादक शेतकरी अनुदानापासून वंचित

पानपिंपरी उत्पादक शेतकरी अनुदानापासून वंचित

Next

उपासमारीची पाळी : विभागीय स्तरावरील समिती केव्हा होणार?

अंजनगाव सुर्जी : सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या अमरावती, अकोला, बुलडाणा या जिल्ह्यांमध्ये साठ-सत्तर वर्षांपासून परंपरागत पद्धतीने पान पिपरी, मुसळी या वनौषधी पिकाची लागवड केली जाते. मात्र, अनुदान न मिळाल्याने येथील पानपिंपरी उत्पादक हवालदिल झाला आहे.

दरवर्षी पानपिंपरी अनुदानासंबंधी प्रस्ताव हे कृषी विभागाकडे सादर करण्यात येतात. त्यानुसार सन २०१८-१९ चे प्रस्ताव शेतकऱ्यांकडून सादर झाले असताना राज्याच्या कृषी विभागाने वरिष्ठ स्तरावर अनुदान निधीची मागणी केली नाही. केंद्र शासनाकडून ९ हजार ९५८ हेक्टर क्षेत्रावर वनौषधी लागवड मंजुरीसाठी २१ कोटी २४ लाख रुपये निधीसुद्धा उपलब्ध करून दिला. मात्र, राज्य शासनाकडून २०१८-१९ साठी अनुदान मागणी अहवालच पाठविला नसल्यामुळे पानपिंपरी उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही. याला जबाबदार कोण, हा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.

दरम्यान, या पिकावर दरवर्षी येणारी संकटे व त्यातील जाचक अटींवर तोडगा काढण्यासाठी विभागीय स्तरावर एक समिती नेमण्याचे आदेशित करण्यात आले होते. परंतु, मागील प्रलंबित अनुदान मिळालेले नसताना, पाच महिन्यांत समितीसुद्धा नेमली गेली नाही.

----------

Web Title: Panpimpri growers deprived of subsidy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.