राजापेठ उड्डाणपुलाखाली घसरल्या पन्नासेक दुचाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 01:15 AM2019-08-07T01:15:33+5:302019-08-07T01:15:59+5:30

राजापेठ उड्डाणपुलाखालील रस्ता चिखलमुळे निसरडा झाला आहे. या मार्गावरून जाणाऱ्या पन्नासेक दुचाकी सोमवार व मंगळवार या दोन दिवसांत घसरून चालक जखमी झाले आहेत. या रस्त्याच्या देखभालीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असल्याने तातडीने तोडगा काढण्याची मागणी होत आहे.

Pansek bike ride under Rajpath flight bridge | राजापेठ उड्डाणपुलाखाली घसरल्या पन्नासेक दुचाकी

राजापेठ उड्डाणपुलाखाली घसरल्या पन्नासेक दुचाकी

Next
ठळक मुद्देअनेक जण जखमी : देखभाल-दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राजापेठ उड्डाणपुलाखालील रस्ता चिखलमुळे निसरडा झाला आहे. या मार्गावरून जाणाऱ्या पन्नासेक दुचाकी सोमवार व मंगळवार या दोन दिवसांत घसरून चालक जखमी झाले आहेत. या रस्त्याच्या देखभालीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असल्याने तातडीने तोडगा काढण्याची मागणी होत आहे.
राजापेठ रेल्वे उड्डाणपुलाचे काम युद्धस्तरावर सुरू असल्यामुळे तेथे ट्रकचे आवागमन सुरू आहे. ट्रकमधून मातीची ने-आण केली जात असल्यामुळे तेथील रस्त्यावर माती साचलेली आहे. पावसाच्या पाण्यामुळे मातीचा चिखल झाल्याने उड्डाणपुलाखालील मार्ग निसरडा झालेला आहे. या रस्त्यावरून जाणाºया दुचाकी व मोपेड वाहने अचानक घसरून अपघात होत आहे. यामुळे अनेक नागरिक जखमी झाले आहेत. मंगळवारी एका महिलेचे वाहन घसरल्याने ती गंभीर जखमी झाली. दिवसांतून अनेक वाहने या रस्त्यावरून घसरत असल्याचे पाहून तेथील व्यापारी मंडळी मदतीला धावून जात आहेत. रेल्वे ब्रिजचे काम महापालिकेमार्फत होत आहे, तर उड्डाणपुलाखालील रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आहे. त्याचे काँक्रीटीकरण सुरू होणार होते. मात्र, अद्याप ते काम करण्यात आले नसल्याने दुचाकी घसरून अपघात होत आहेत.

उड्डाणपुलाखालील रस्त्याचे सिमेंटीकरण केले जाणार आहे. पावसामुळे ते काम थांबविले होते. मात्र, सध्याच्या समस्येविषयी तोडगा काढू. याविषयी महापालिकेशी संपर्क साधू.
- सदानंद शेंडगे
कार्यकारी अभियंता
सार्वजनिक बांधकाम विभाग.

Web Title: Pansek bike ride under Rajpath flight bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.