विदर्भाच्या नंदनवनाचा पारा घसरू लागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 10:18 PM2018-12-15T22:18:44+5:302018-12-15T22:19:56+5:30

विदर्भाचे एकमेव पर्यटनस्थळ चिखलदरा नंदनवनाचा पारा घसरू लागला आहे. हुडहुडी भरविणाऱ्या थंडीमुळे सायंकाळी ४ पासूनच शेकोट्या पेटू लागल्या आहेत. येथे भेट देणारे पर्यटक गरम कपडे घालूनच पर्यटनाचा आस्वाद घेत असल्याचे दिसून येत आहे.

The paradhi of the Vidarbha began to subside | विदर्भाच्या नंदनवनाचा पारा घसरू लागला

विदर्भाच्या नंदनवनाचा पारा घसरू लागला

Next
ठळक मुद्देशेकोट्या पेटल्या : चिखलदरा १० अंशावर

नरेंद्र जावरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : विदर्भाचे एकमेव पर्यटनस्थळ चिखलदरा नंदनवनाचा पारा घसरू लागला आहे. हुडहुडी भरविणाऱ्या थंडीमुळे सायंकाळी ४ पासूनच शेकोट्या पेटू लागल्या आहेत. येथे भेट देणारे पर्यटक गरम कपडे घालूनच पर्यटनाचा आस्वाद घेत असल्याचे दिसून येत आहे.
चिखलदरा पर्यटनस्थळ समुद्रसपाटीपासून ३६०० फूट उंचावर असल्याने वातावरण आल्हाददायक राहते. आता हुडहुडी भरणारी थंडी येथे येणाºया पर्यटकांसह नगरवासीयांनाही जाणवू लागली आहे. स्थानिक रहिवासी सायंकाळी ४ वाजतापासूनच शेकोट्या पेटवून थंडीपासून आपले संरक्षण करीत आहेत. त्यातच आठवड्यापासून ढगाळ वातावरण असतानाही पारा वधारला नाही. त्यामुळे थंडीची बोच कायम आहे. मेळघाटच्या कुशीत सर्वत्र जंगलक्षेत्र असल्याने हवेचा दाब कमी असून, गारवा वाढला आहे. दरम्यान, हवेचा वेग प्रतिसेकंद चार ते पाच मीटर नोंदविल्या गेल्याची माहिती येथील पवन ऊर्जा प्रकल्पाचे कर्मचारी गणेश पाटील यांनी सांगितले. चिखलदºयात आॅक्टोबर ते एप्रिल दरम्यान हवेचा वेग कमी असल्याचे नोंदविले गेले आहे.
१६ लाखांचा महसूल
चिखलदरा पर्यटनस्थळावर मोठ्या प्रमाणात दरवर्षी पर्यटक हजेरी लावतात. एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांत १ लाख १० हजार पर्यटकांनी हजेरी लावली असून, चिखलदरा नगरपालिकेला जवळपास १६ लाख रुपयांचा महसूल पर्यटक व वाहन करापासून प्राप्त झाला आहे. शनिवार, रविवारी पर्यटक गर्दी करतात.
तिन्ही ऋतूंमध्ये वेगळी छाप
हिवाळा, उन्हाळा, पावसाळा, या तिन्ही ऋतूंमध्ये चिखलदरा पर्यटनस्थळ पर्यटकांना येथे येण्यास खुणावते. उन्हाळ्यात थंड हवेसाठी येथे पर्यटक येत असले तरी पावसाळा व हिवाळ्यातदेखील पर्यटकांचा ओघ कायम असतो.
कमाल तापमान १६ अंश
चिखलदरा पर्यटनस्थळावर १५ डिसेंबर रोजी सायंकाळी येथील सिपना महाविद्यालयात किमान तापमानाची नोंद १० अंश सेल्सिअस नोंदविले गेले. कमाल तापमान १६ अंश सेल्सिअस, तर सापेक्ष आर्द्रता ७५ टक्के असल्याची नोंद पर्यावरण विभागाचे प्राध्यापक विजय मंगळे यांनी घेतली आहे. येथे किमान तापमानाची नोंद ७ अंश सेल्सिअस राहिली आहे.

Web Title: The paradhi of the Vidarbha began to subside

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.