विद्यार्थ्यांच्या स्थानांतरणास पालकांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 10:15 PM2017-09-27T22:15:20+5:302017-09-27T22:15:33+5:30

मेलघाटातील शंभर आदिवासी विद्यार्थ्यांना अमरावतीच्या लोटस इंग्लिश स्कूलमधून अन्य जिल्ह्यात स्थानांतरित करण्याच्या प्रस्तावाला पालकांनी विरोध दर्शविला आहे.

Parental opposition for the transfer of students | विद्यार्थ्यांच्या स्थानांतरणास पालकांचा विरोध

विद्यार्थ्यांच्या स्थानांतरणास पालकांचा विरोध

Next
ठळक मुद्देजिल्ह्यातच करा स्थानांतरण : लोटस इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी

लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : मेलघाटातील शंभर आदिवासी विद्यार्थ्यांना अमरावतीच्या लोटस इंग्लिश स्कूलमधून अन्य जिल्ह्यात स्थानांतरित करण्याच्या प्रस्तावाला पालकांनी विरोध दर्शविला आहे. येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयात मंगळवारी पालकांनी धडक देत याबाबत विरोध नोंदविला.
मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळेत शिक्षण मिळावे यासाठी आदिवासी विकास प्रकल्पाद्वारे अमरावती येथील लोटस इंग्लिश स्कूलमध्ये सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षासाठी मेळघाटातील शंभर आदिवासी विद्यार्थ्यांची निवड केली होती. शालेय योजनेकरिता विहित सुविधांबाबत त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे शासनाने लोटस इंग्लिश स्कूलची मान्यता रद्द के ली. परिणामी तेथे शिकणाºया विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाकरिता लातूर जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत स्थानांतरित करण्याचे पत्र आदिवासी विभागाच्या अप्पर आयुक्तांनी २४ सप्टेंबर रोजी काढले. या स्थानांतरण प्रक्रियेला विद्यार्थ्यांच्या पालकांनी विरोध दर्शवित अप्पर आयुक्त यांच्याकडे व धारणी येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयात लेखी तक्रार दिली आहे.

इंग्रजी माध्यमाच्या अमरावती शहरासह जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी, धामनगाव रेल्वे येथे नामांकित शाळा आहेत. या शाळांमध्ये आमच्या मुलांना शिक्षण द्या. मुलांना लातूर येथे स्थानातंरित करायचे होते, तर आधीच प्रवेश द्यायचा नव्हता.
- ललिता जावरकर,पालक, टिटंम्बा

विद्यार्थ्यांना २०१७-१८ या शैक्षणिक सत्राच्या प्रवेशाआधीच शाळेची मान्यता शासनाने रद्द करायला हवी होती. मधेच इतरत्र स्थानांतरण म्हणजे आदिवासी विद्यार्थ्यांची थट्टा आहे.
- भिल्या पुण्या पटेल,
पालक, दहेन्डा

Web Title: Parental opposition for the transfer of students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.