मोफत प्रवेशाकडे पालकांची पाठ; आरटीईच्या ६५ टक्के जागा भरल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:16 AM2021-07-14T04:16:08+5:302021-07-14T04:16:08+5:30

अमरावती : बालकांच्या सक्तीच्या व मोफत शिक्षणाचा अधिकार आरटीई या नियमानुसार आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना पहिलीसाठी प्रवेश प्रक्रिया गेल्या ...

Parents' back to free admission; 65% of RTE seats were filled | मोफत प्रवेशाकडे पालकांची पाठ; आरटीईच्या ६५ टक्के जागा भरल्या

मोफत प्रवेशाकडे पालकांची पाठ; आरटीईच्या ६५ टक्के जागा भरल्या

Next

अमरावती : बालकांच्या सक्तीच्या व मोफत शिक्षणाचा अधिकार आरटीई या नियमानुसार आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना पहिलीसाठी प्रवेश प्रक्रिया गेल्या महिन्यापर्यत सुरू आहे. आतापर्यत ६५ टक्के प्रवेश झाले असून २५ टक्के जागांवर प्रवेश प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. जिल्ह्यातील २४४ शाळांमध्ये २०७६ जागांसाठी ५९१८अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी सोडतीत १९८० जणांची निवड करण्यात आली होती. आतापर्यत ११०३ पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित केला आहे.तर ८७७ प्रवेशाची कारवाई संथगतीने सुरू आहे.विविध तांत्रिक अडचणी येत असल्याने प्रवेश प्रक्रियाही लांबणीवर पडत आहे. त्यामुळे २३ जुलै पर्यत प्रवेशाची कारवाई पूर्ण होणे अपेक्षित आहे.

बॉक्स

आरटीई अंतर्गत जिल्ह्यातील शाळांची नोंदणी २४४

एकूण जागा २०७६

आतापर्यंत झालेले प्रवेश ११०३

शिल्लक प्रवेश ८७७

बॉक्स

दुसऱ्यांदा मुदतवाढ

लॉटरी पद्धतीने प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या पालकांना निवड झालेल्या शाळेत प्रत्यक्षात प्रवेश घेण्यासाठी ३० जून पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र या काळात कमी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी प्रवेश प्रक्रियेला दुसऱ्यांदा मुदत वाढ देण्यात आली आहे. आता २३ जुलैपर्यंत प्रवेश घेता येणार आहेत.

बॉक्स

६५ टक्के पालकांचा प्रतिसाद

जिल्ह्यात २४४ शाळांमध्ये आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.२०७६ जागासाठी १९८० जण पात्र विद्यार्थ्याची निवड झाली आहे. या सर्वाना प्रवेश देण्याबाबत सूचना देण्यात आल्या असून प्रवेशाची कारवाई सुरू आहे.

एजाज खान शिक्षणाधिकारी प्राथमिक

कोट

आरटीई अंतर्गत काही पालकांनी महत्त्वाच्या शाळांची नावे दिली होती. एका शाळेत अनेकांना प्रवेश हवा असल्याने संख्येची मर्यादा आली. शिवाय सोडतीत अनेकांची निवड झाली नाही.त्यामुळे प्रवेशास अडथळा आला

शिवचरण देशमुख

पालक

कोट

आरटीई प्रवेशासाठी अर्ज केला मात्र सोडतीत प्रवेशाची संधी मिळाली नाही.आरटीई नंबर लागला असता तर जवळची शाळा मिळेल या अपेक्षवर होते.परंतु सर्व निराशा झाली.त्यामुळे जवळच्या शाळेत प्रवेश घ्यावा लागला आहे.

गणेश सोनोने

पालक

तालुकानिहाय शाळां आणी जागा

तालुका शाळा जागा प्रवेश बाकी जागा

अचलपूर १७ १६३ ६९

अमरावती २१ २६० ८९

अमरावती मनपा ७१ ६४६ ३७८

अंजनगाव सुर्जी २० ७४ २८

भातकुली ०८ ६० ०२

चांदूर बाजार १८ १०७ ४९

चांदूर रेल्वे ०५ ४७ १७

चिखलदरा ०१ ०२ ००

दर्यापूर १७ १३१ २८

धामनगाव रेल्वे ११ ८५ १७

धारणी ०२ १८ १८

मोर्शी १७ १४४ ३७

नांदगाव खंडेश्वर. ०९ ४१ १९

तिवसा १० ५४ ५४

वरूड १७ १४९ ५९

Web Title: Parents' back to free admission; 65% of RTE seats were filled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.