पालकांनो सावधान ! व्हॅलेंटाईन ‘डे’ ला आपल्या मुलांना सांभाळा !
By admin | Published: February 14, 2017 12:09 AM2017-02-14T00:09:14+5:302017-02-14T00:09:14+5:30
तालुकयातील नागठाणा, शेकदरी, गव्हाणकुंड, पंढरी परिसरातील मंदिरे व प्रकल्पावर व्हलेनटाईन ‘डे’ला प्रेमीयुगुलांचा सुळसुळाट राहणार आहे.
प्रकल्प : मंदिरात साध्या वेशात पोलीस गस्तीवर
वरूड : तालुकयातील नागठाणा, शेकदरी, गव्हाणकुंड, पंढरी परिसरातील मंदिरे व प्रकल्पावर व्हलेनटाईन ‘डे’ला प्रेमीयुगुलांचा सुळसुळाट राहणार आहे. त्यामुळे प्रशासनाने याची दखल घेऊन साध्या वेशातील पोलिसांना तैनात करण्यात येणार आहे. रासलिला आणि पाश्चात संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्याविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. बंजरंग दलाच्यावतीने व्हॅलेंटाईन डे चा निषेध करणारे प्रसिध्दी पत्रक काढून अशा व्यभिचारींना आळा घालण्याकरिता दंड थोपाटले आहे. यामुळे पालकांनो सावधान राहून आपल्या मुलामुलींना सांभाळून निर्जन स्थळी जाणाऱ्यांना आवरण्याचे आवाहनही केले आहे.
पाश्चात संस्कृतीचे दर्शन घडवून प्रेमाच्या नावावर लंैगिक शोषण करणाऱ्या सख्याहरींना धडा शिकविण्यासाठी १४ फेब्रुवारी रोजी व्हॅलेनटाईन डेला पोलीस प्रशासन सज्ज झाले आहेत. तालुक्यातील सिंचन प्रकल्प, देवस्थाने, प्रेक्षणीय स्थळे, जंगल परिसर आदी भागात प्रेमीयुगुलांवर लक्ष ठेवले जाणार आहे. वाईट कृत्य करणाऱ्याविरुद्ध कारवाईर् सुध्दा केली जाणार आहे. यासाठी पोलीस तैनात राहणार असून समाज विघातक कृत्य करणाऱ्या प्रेमीयुगुलाविरुद्ध कारवाई केली जाणार असल्याच ठाणेदार गोरख दिवे यांनी सांगितले. दुसरीकडे बजरंग दल वरुड तालुका शाखेच्यावतीने दंड थोपाटले असून प्रेमाला विरोध नाही तर पाश्चात संस्कृतीचे दर्शन घडवून समाजाला लाजवेल असे कृत्य करणाऱ्यांना धडा शिकविण्याचा इशारा देऊन व्हॅलेंटाईन डे चा निषेध केला आहे. यासाठी स्वयसेवी संस्था आणि पोलीस लक्ष ठेवून असल्याने दुष्कृत्य टाळावे, अन्यथा कारवाईला पुढे जा, असा इशारा देण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)
ठाणेदारांनी केले प्रबोधन!
व्हॅलेटाईन डे' प्रेमीयुगुलांचा सावळागोंधळ थांबवण्यिाकरिता तसेच दुष्प्रवृत्तीना आळा घालण्याकरिता ठाणेदार गोरख दिवे यांनी शहरातील महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना प्रबोधन आणि मार्गदर्शन करून पाश्चात्य संस्कृतीचे अवडंबर माजवू नका. आपल्या आई-वडिलांचा कुठेही मान सन्मान हिरावला जाणार नाही, याची काळजी घ्या. प्रेमाच्या नावावर वाटेल करू नय, असे मार्गदर्शन करण्यात आले.