शुल्कवाढीच्या विरोधात पालकांची शिक्षणाधिकाऱ्यांकडे धाव
By admin | Published: May 9, 2017 12:12 AM2017-05-09T00:12:10+5:302017-05-09T00:12:10+5:30
अंबापेठस्थित मदर्स पेट इंग्लिश स्कूलच्या प्रवेश शुल्कवाढी विरोधात सोमवारी पालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे धाव घेतली.
फसवणूक : मदर्स पेट इंग्लिश स्कूलमधील प्रकार
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अंबापेठस्थित मदर्स पेट इंग्लिश स्कूलच्या प्रवेश शुल्कवाढी विरोधात सोमवारी पालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. शाळेने सीबीएसई पॅटर्नच्या नावावर फसवणूक केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. याबाबत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी पालकांनी शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे यांना सादर तक्रारीतून केली आहे.
पालक प्रतिनिधीना सभेला न बोलावता एकतर्फी निर्णय घेण्याचे प्रकार शाळेत चालतात. अनियमित शिक्षण,वारंवार शिक्षण बदलविण्याचे प्रकार होतात. मान्यता नसतानाही सीबीएसई पॅटर्नच्या नावाखाली प्रवेश करून घेणे. शिक्षण शुल्कात प्रचंड वाढ करणे, प्रसाधन गृहाची अस्वच्छता तसेच शुध्द पाण्याचा अभाव, शिक्षण शुल्क लेट फी आकारणे, शुल्क घेऊनही अधिकृत पावती न देणे, प्रासपेक्टचे २०० रुपये घेऊनही पावती न देणे. शुल्क भरण्यासाठी पाल्यावर मानसिक दबाव आणणे. दरवर्षी शाळेचा गणवेश बदलविणे. मुलांना प्राथनेसाठी व खेळण्याकरिता प्रागंण नसणे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा अभाव. अशा आदी समस्यासंदर्भात पालकांना सोमवारी शिक्षणाधिकाऱ्यांकडे धाव घेतली होती. शाळेच्या या मनमानी कारभाराची चौकशी करावी, अशी मागणी पालकांची आहे. यावेळी विनोद दशस्त्र, विलास नाकतोडे, सीताराम काळे, पंकज बोबडे, नितीन गुलवाडे, राहुल कुळकर्णी, रितेश बारड आदी उपस्थित होते.