पालकांनो, पोस्ट कोविडच्या मुलांना जपा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:26 AM2021-09-02T04:26:33+5:302021-09-02T04:26:33+5:30
अमरावती : कोरोना होऊन गेलेल्या मुलांमध्ये मल्टीसिस्टीम इन्फ्रामेट्री सिन्ड्रोम याची लक्षणे आढळतात. ज्या कुटुंबात मागील तीन महिन्यात कुणी तरी ...
अमरावती : कोरोना होऊन गेलेल्या मुलांमध्ये मल्टीसिस्टीम इन्फ्रामेट्री सिन्ड्रोम याची लक्षणे आढळतात. ज्या कुटुंबात मागील तीन महिन्यात कुणी तरी पाॅझिटिव्ह आले अशा कुटुंबातील लहान बाळांची ॲन्टिबाॅडी तपासणी करावी. जेणे करून या मुलांमध्ये कोरोना होऊन गेला काय, हे लक्षात येते. त्यानंतर पोस्ट कोविड उपचार करावा की नाही याचा सल्लाही डाॅक्टरांकडून घ्यावा. त्यामुळे धोका टाळता येणे सहज शक्य आहे. सध्या डेंग्यू, व्हायरल फिवर, मलेरिया या सारख्या आजारांची साथ सुरू आहे. त्यात पोस्ट कोविड बाळांना त्रास वाढण्याचा धोका असतो.
बॉक्स
१५ वर्षांखालील १२६ पॉझिटिव्ह
- कोरोनाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्यात तब्बल ११२ बालक पाॅझिटिव्ह आढळून आले होते.
- दुसऱ्या लाटेत २४ बालकांना कोरोनाची बाधा झाली होती.
त्यामध्ये १३ मुली व ११ मुलांचा समावेश होता. पहिल्या लाटेत ५४ मुली व ५८ मुलांना कोरोनाने संसर्ग केला. त्यातील बहुतांश जण बाहेर आले.
बॉक्स
या लक्षणांकडेअसू द्या लक्ष
-जोराचा ताप येणे
- पातळ शौच होणे
- वारंवार उलट्या होणे
- अंगावर पुरळ येणे
- सर्दी, खोकला वाढणे
- भूक मंदावणे
------------
कोट
बालरोग तज्ज्ञ म्हणतात
पोस्ट कोविड बाळांची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. घाबरून न जाता सतर्क रहावे, वेळोवेळी डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा.
- डाॅ. हेमंत मुरके, बालरोग तज्ज्ञ
--------------
पोस्ट कोविड बाळांच्या पालकांनी घाबरण्याची गरज नाही. केवळ बाळाचे दुखणे अंगावर काढू नये. डाॅक्टरांच्या सल्ल्याने ॲन्टिबाॅडी तपासणी करून घ्यावी. लक्षणे वाढताच दवाखान्यात जा.
- डॉ. नाजीम अकरम, बालरोगतज्ज्ञ