उभा केलेला ट्रक पळविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:10 AM2021-07-16T04:10:50+5:302021-07-16T04:10:50+5:30
क्षुल्लक कारणावरून डोक्यावर दगड मारला धारणी : दारू पिऊन शिवीगाळ केल्याने हटकले असता, महिलेच्या डोक्यावर दगड मारून जखमी केले. ...
क्षुल्लक कारणावरून डोक्यावर दगड मारला
धारणी : दारू पिऊन शिवीगाळ केल्याने हटकले असता, महिलेच्या डोक्यावर दगड मारून जखमी केले. ही घटना १३ जुलै रोजी रात्री तालुक्यातील काल्पी येथे घडली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी रामसिंग गुंजी कास्देकर (काल्पी) विरुद्ध गुन्हा नोंदविला.
-------------
पैशासाठी तगादा लावल्याने काठीने मारहाण
धामणगाव रेल्वे : आईला पैसे मागितले असता नकार दिल्याने घरातील साहित्याची फेकफाक करून धिंगाणा घातला. शिवीगाळ केल्यावरून पुतण्याने काठीने मारून जखमी केले. ही घटना जुना धामणगाव येथे १३ जुलै रोजी रात्री घडली. तक्रारीवरून आरोपी वैभव भोलाराम उईके (२२) विरुद्ध दत्तापूर पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
-------------
४८०० रुपयांचा ऐवज लंपास
धामणगाव रेल्वे : हातातील कॅरीबेगमध्ये ठेवलेली पर्स काढून त्यातील सोन्याचे दागिने व नगदी रोख असा ४८०० रुपयांचा ऐवज अज्ञाताने लंपास केला. ही घटना शहरातील संजय ज्वेलर्ससमोर १३ जुलै रोजी दुपारी घडली. महिलेच्या तक्रारीवरून दत्तापूर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला.
--------------------------------
काठीने इसमाच्या गालावर मारले
तळेगाव दशासर : दुकानात जात असलेल्या इसमाला शिवीगाळ करून काठीने गालावर मारून जखमी केले. ही घटना १३ जुलै रोजी निंभा येथे घडली. ज्ञानेश्वर नारायण केवट यांच्या तक्रारीवरून तळेगाव पोलिसांनी कृष्णा सहारे (३७, रा. निंभा) विरुद्ध गुन्हा नोंदविला.
-------------------
कारची दुचाकीला धडक, महिलेचा मृत्यू
तिवसा : दवाखान्या जात असलेल्या दुचाकीला मागून आलेल्या कारचालकाने धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर पती जखमी झाले. ही घटना नागपूर हायवेवरील वरखेड फाट्यानजीक १८ जून रोजी घडली होती. सुनील रामदास गोहत्रे (४२, रा. निभर्णी) यांच्या तक्रारीवरून तिवसा पोलिसांनी १४ जुलै रोजी एमएच १२ केएन ९५८२ क्रमांकाच्या कारचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला.
-------------
बॅगेतील पर्स अज्ञाताने पळविली
चांदूर रेल्वे : मार्केटमध्ये खरेदीकरिता गेलेल्या महिलेच्या बॅगेतील पर्स अज्ञाताने लंपास केली. ही घटना चांदूर रेल्वे येथे १४ जुलै रोजी सायंकाळी उघड झाली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला.