पार्किंग, अतिक्रमण कारवाईत समन्वय राखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2016 12:26 AM2016-11-11T00:26:35+5:302016-11-11T00:26:35+5:30

पार्किंग आणि अतिक्रमण कारवाईदरम्यान महापालिका आणि पोलीस प्रशासनाने समन्वय राखावा,

Parking, coordination of encroachment operations | पार्किंग, अतिक्रमण कारवाईत समन्वय राखा

पार्किंग, अतिक्रमण कारवाईत समन्वय राखा

Next

सुनील देशमुख : महापालिकेत बैठक, सामान्य जनतेला वेठीस न धरण्याचे निर्देश, विविध विषयांवर चर्चा
अमरावती : पार्किंग आणि अतिक्रमण कारवाईदरम्यान महापालिका आणि पोलीस प्रशासनाने समन्वय राखावा, अशा सूचना आ. सुनील देशमुख यांनी गुरुवारी दिल्या. त्यांनी महानगरपालिका सभागृहात विविध विषयांवर बैठक घेतली. बैठकीदरम्यान त्यांनी पार्किंग व्यवस्था, होर्डिंग्ज, बॅनर, हॉकर्स झोन, भुयारी गटार योजना, पाणीपुरवठा योजना, वाहतूक व्यवस्था आदींवर चर्चा करून निर्देश दिलेत.
महावितरणद्वारे मनपाक्षेत्रात करण्यात येणाऱ्या कामांमुळे रस्त्यांची होणारी हानी, पाठ्यपुस्तक महामंडळ येथील रस्ता, मौजा वडाळी सर्व्हे क्र. ९४ मधील विकासयोजना, आरक्षण क्रमांक १७४ धोबीघाट करारनामा तीन वर्षाऐवजी ५ वर्षांचा करण्यात यावा, याविषयावर सविस्तर चर्चा करून आ. देशमुख यांनी धोबी समाज संघटनेच्या मागण्यांबाबत तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्यात.
मजिप्रा, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी शहरातील भुयारी गटार योजनेबाबत समन्वय साधून ही योजना पूर्णत्वास नेण्याचे आदेश दिले. महापालिका आयुक्त पवार यांनी भुयारी गटार योजनेचे प्रॉपर्टी कनेक्शन जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत ही योजना कार्यन्वित होऊ शकणार नाही, असे सांगितले. त्यामुळे पुढील काळात याबाबत महापालिकेद्वारे काही कडक पाऊले उचलण्याचे संकेत दिलेत. शहरातील अतिक्रमणाबाबत शहर पोलीस यंत्रणा व मनपा अतिक्रमण विभाग यांनी समन्वयाने पुढील कार्यवाही करण्याचे आदेश देखील त्यांनी दिलेत.कोणतीही योजना राबविताना संबंधित विभागांना माहिती देवून काम करावे, असे सांगितले.
बैठकीला आयुक्त हेमंतकुमार पवार, अधीक्षक अभियंता महावितरण अरविंद भारीकर, कार्यकारी अभियंता महावितरण दिलीप मोहोड, कार्यकारी अभियंता, मजिप्रा श्वेता बॅनर्जी, सहायक अभियंता महावितरण ज्ञानेश्वर देवतळे, प्रशांत आर.गवळी, सहायक आयुक्त निविदीता घार्गे, सोनाली यादव, शहर अभियंता जीवन सदार, सुरेन्द्र कांबळे, कार्यकारी अभियंता अनंत पोतदार आदींची उपस्थिती होती.

Web Title: Parking, coordination of encroachment operations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.