संसदीय पथकाने दाखवली पाठ प्रशासनाने सोडला सुटकेचा श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:19 AM2021-08-18T04:19:07+5:302021-08-18T04:19:07+5:30
पथ्रोट : जिल्हाभराच्या दौऱ्यावर असलेल्या संसदीय समिती पथकाने कमालीची गोपनीयता बाळगत दर्यापूर मार्गे अंजनगाव, पथ्रोट येथील संबंधित कार्यालयांना पाठ ...
पथ्रोट : जिल्हाभराच्या दौऱ्यावर असलेल्या संसदीय समिती पथकाने कमालीची गोपनीयता बाळगत दर्यापूर मार्गे अंजनगाव, पथ्रोट येथील संबंधित कार्यालयांना पाठ दाखवत अचलपूर येथे पंचायत समिती व दोन खासगी बँकाना भेट देत जिल्हा मुख्यालयी अमरावती येथे रवाना झाली. धास्तावलेल्या प्रशासनाने समितीने तालुका सोडताच सुटकेचा श्वास घेतला.
जिल्हा कार्यालयाकडून संबंधित महसूल, आरोग्य विभाग, पंचायत समिती, स्थानिक स्वराज्य संस्था यांना संसदीय पथक भेट देणार असल्याचे सुतोवाच करताच सर्व कार्यालयीन कर्मचाऱ्यंचे धाबे दणाणले होते. पोलीस विभागाने मार्गावर चोख बंदोबस्त ठेवला होता.
काही कार्यालयांचा परिसर झाडूनपुसून लख्ख केला होता. प्रवेशद्वारा रांगोळी काढून स्वागताचे फलक लागले होते. अंजनगाव व अचलपूर तालुक्यातील पथ्रोट येथे भेट देण्याची दाट शक्यता असूनही संसदीय समितीने भेट न दिल्याने नागरिकासह राजकीय पदाधिकाऱ्यांच्या पदरी निराशा पडली. मात्र, अधिकार्यासह कर्मचारी सुखावले. पथ्रोट येथे केंद्रिय निधीतुन जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत पाणीपुरवठा योजना साकारली.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन अंतर्गत प्रा. आरोग्य केंद्र ऊभारल्या गेले असुनही अद्याप पावतो कार्यान्वीत न झाल्याने केंद्रिय समीतीची भेट देणे गरजेचे होते. स्थानीक ठिकाणी भेट न दिल्याने जिल्हा भाजपा उपाध्यक्ष सुधीर रसे यानी जलस्वराज्य प्रकल्पातील जलशुद्धीकरण केंद्रासह पसरविलेल्या पाईपलाईन मध्ये भ्रष्टाचार झाल्याची तक्रार केंद्रिय समीतेचे प्रमुख प्रतापराव जाधव यांच्याकडे पं. समीती अचलपुर येथे दिली. ** केंद्रिय निधीतुन २ ठळक कामे झाल्याने संसदिय समीतेने भेट देणे गरजेचे होते असे जि.भाजपा उपाध्यक्ष सुधीर रसे यानी लोकमत शी बोलताना सांगीतले**