इंदलानजीकच्या विहिरीत अर्धवट जळालेला औषधीसाठा आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 05:00 AM2021-06-04T05:00:00+5:302021-06-04T05:00:34+5:30
ले-आऊटमधील प्लॉट बघण्याकरिता गुरुवारी दुपारी ते गेले होते. परिसरात फिरत असताना त्यांनी विहिरीत डोकावून बघितले असता, त्यांना आठ ते १० पोत्यांमध्ये अर्धवट जळालेल्या अवस्थेत औषधीसाठा आढळून आला. त्यांनी याची माहिती ‘लोकमत’ला दिली. घटनास्थळी भेट दिली असता, औषधीसाठ्यांपैकी काही औषधांची मुदत २०२२ पर्यंत असल्याचे निदर्शनास आले.
मनीष तसरे
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यांतर्गत इंदला गावानजीकच्या शेतातील एका अर्धवट बांधकाम केलेल्या विहिरीत अपूर्ण जळालेले आठ ते १० पोते औषधीसाठा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना गुरुवारी सांयकाळी ६ वाजताच्या सुमारास उघडकीस आला.
यातील काही औषधांची मुदतसुद्धा संपायची आहे. त्यामुळे हा साठा येथे कुणी आणला? कशासाठी फेकून दिला? याचा शोध पोलिसांनी व औषधी प्रशासन विभागाने घ्यावा, अशी मागणी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
प्राप्तमाहितीनुसार, शिवाजी किरकटे, मंगेश कोकाटे व बिजवे हे इंदला गावानजीकच्या शेतात ले-आऊट पडले आहे. या ले-आऊटमधील प्लॉट बघण्याकरिता गुरुवारी दुपारी ते गेले होते. परिसरात फिरत असताना त्यांनी विहिरीत डोकावून बघितले असता, त्यांना आठ ते १० पोत्यांमध्ये अर्धवट जळालेल्या अवस्थेत औषधीसाठा आढळून आला. त्यांनी याची माहिती ‘लोकमत’ला दिली. घटनास्थळी भेट दिली असता, औषधीसाठ्यांपैकी काही औषधांची मुदत २०२२ पर्यंत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सदर औषधी कशासाठी फेकण्यात आल्या? त्या कालबाह्य आहे का? जर असतील तर अशाप्रकारे उघड्यावर फेकणे नियमबाह्य नव्हे काय? याचा तपास पोलीस व एफडीएच्या अधिकाऱ्यांनी करावा, अशी मागणी होत आहे.