भातकुली काठावर ‘पास’; दहाही पालिका ‘फेल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:15 AM2021-06-09T04:15:51+5:302021-06-09T04:15:51+5:30

फोटो पी ०७ माझी वसुंधरा पान २ ची लिड ‘माझी वसुंधरा’ अभियान : १५०० गुणांची होती परीक्षा प्रदीप ...

‘Pass’ on the edge of Bhatkuli; Ten municipalities 'fail' | भातकुली काठावर ‘पास’; दहाही पालिका ‘फेल’

भातकुली काठावर ‘पास’; दहाही पालिका ‘फेल’

Next

फोटो पी ०७ माझी वसुंधरा

पान २ ची लिड

‘माझी वसुंधरा’ अभियान : १५०० गुणांची होती परीक्षा

प्रदीप भाकरे

अमरावती : पंचतत्त्वाचे संवर्धन, संरक्षण व जतन करून शाश्वत विकास साधण्यासाठी सुरू केलेल्या शासनाच्या ‘माझी वसुंधरा’ अभियानात भातकुलीने नगरपंचायत गटात राज्यातून आठवा व जिल्ह्यातून पहिला क्रमांक पटकाविला. भातकुली नगरपंचायत १५०० पैकी ६२९ गुण मिळवून काठावर पास झाली. मात्र, जिल्ह्यातील इतर दहा पालिका, तीन नगरपंचायती व अमरावती महापालिका या स्पर्धेत सपशेल अपयशी ठरल्या आहेत.

राज्यातील सहभागी २३५ नगरपालिकांमधून जिल्ह्यातील दहा नगरपालिका ५ ते सर्वाधिक २० टक्के गुण मिळवू शकल्या. चिखलदरा, शेंदूरजनाघाट व दर्यापूर पालिका अनुक्रमे ६०, ७५ व ८९ व्या क्रमांकावर राहिल्या. राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय विभागाच्यावतीने ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वावर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांची २ ऑक्टोबर २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत पाच गटांत स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचा पुरस्कार वितरण समारंभ शनिवारी पर्यावरण दिनी ऑनलाईन पद्धतीने झाला. एप्रिल महिन्यात राज्यस्तरावरील पथकाने शहर व ग्रामपंचायतींना प्रत्यक्ष भेटी देऊन मूल्यांकन केले होते.

-----------

बॉक्स

अमरावती २८ मध्ये २१ व्या क्रमांकावर

जिल्ह्यातील पालिका, नगरपंचायत तथा ग्रामपंचायतींप्रमाणे अमरावती महापालिका क्षेत्रात ‘माझी वसुंधरा’ स्पर्धा घेण्यात आली. मात्र, अमरावती महापालिका एकूण २८ अमृत शहरांमध्ये २१ व्या क्रमांकावर राहिली. महानगरपालिकेला १५०० पैकी २६७ गुण प्राप्त झाले.

------

बॉक्स २

असा राहिला नगरपंचायतचा स्कोअर

स्पर्धेत सहभागी झालेल्या १३२ नगरपंचायतींपैकी भातकुली नगरपंचायत आठव्या क्रमांकावर राहिली. या पंचायतीला जिल्ह्यात सर्वाधिक ६२९ गुण मिळाले. २७३ गुण घेऊन तिवसा ३५ व्या स्थानी, १३६ गुण मिळविणारी धारणी नगरपंचायत १०६ व्या क्रमांकावर, तर नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत २३४ गुण मिळवून नगरपंचायत गटात ५१ व्या क्रमांकावर राहिली.

--------

बॉक्स ३

कुऱ्हा ग्रामपंचायतला केवळ १५ गुण

अभियानात ग्रामपंचायतीदेखील सहभागी झाल्या. मात्र, त्यांना १ ते १० टक्के गुण मिळविता आले. त्या सपशेल माघारल्या. सहभागी ३०४ ग्रामपंचायतींमध्ये ब्राम्हणवाडा थडी ११२ गुण घेऊन १२० व्या क्रमांकावर, वलगाव ९८ गुण घेऊन १४३ व्या, येवदा ८६ गुण घेऊन १६१ व्या, ५४ गुण घेऊन नांदगाव पेठ २०३ व्या, तळेगाव दशासर ४२ गुण घेऊन २२५ व्या, तर केवळ १५ गुण घेऊन कुऱ्हा ग्रामपंचायत २७२ व्या क्रमांकावर राहिली.

--------

क्रमांक नगरपालिका गुण

१०२ -चांदूर रेल्वे २५५

११७- मोर्शी २४१

१३८ - अचलपूर २१९

१७३ अंजनगाव सुर्जी १७५

१८२ वरूड १६४

२२९ धामणगाव रेल्वे ८१

६० चिखलदरा ३११

८९ दर्यापूर २७१

१७० चांदूर बाजार १७७

७५ शेंदूरजनाघाट २९३

--------------

सहभागी स्थानिक स्वराज्य संस्था

२३५ नगरपरिषद

२८ अमृत सिटी

१३२ नगरपंचायत

३०४ ग्रामपंचायत

---------

कोट

माझी वसुंधरा या अभियानात एकूण १३२ नगरपंचायतींनी सहभाग घेतला होता. ५ जून रोजी जाहीर झालेल्या निकालामध्ये भातकुली नगरपंचायतने राज्यातून आठवा, तर जिल्ह्यातून पहिला क्रमांक मिळवला. भातकुलीला ६२९ गुण प्राप्त झाले. प्रशासकीय यंत्रणा, लोकप्रतिनिधी तसेच शहरातील सर्व नागरिकांच्या सांघिक प्रयत्नातून हे यश प्राप्त झाले.

- करिश्मा वैद्य, मुख्याधिकारी, भातकुली

--------------

Web Title: ‘Pass’ on the edge of Bhatkuli; Ten municipalities 'fail'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.