खड्डे बुजविले, जुनी पाइप लाइन काढण्याचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 10:51 PM2018-02-11T22:51:49+5:302018-02-11T22:52:22+5:30

विनायकनगर, राधानगर व गाडगेनगर परिसरात नवीन पाईपलाईन टाकल्यानंतर खड्डे बुजविण्यात येत आहे. मात्र, या ठिकाणी पूर्वीची जुनी पाईपलाईनचे काय, असा सवाल नागरिकांचा असून जुनी पाईपलाईन काढण्यात येणार की तशीच ठेवणार या बदलही नागरिकांच्या मनात संदेह निर्माण झाला आहे.

Patchwork, what is the old pipeline removal? | खड्डे बुजविले, जुनी पाइप लाइन काढण्याचे काय?

खड्डे बुजविले, जुनी पाइप लाइन काढण्याचे काय?

Next
ठळक मुद्देकेबल टाकण्याची प्रक्रिया सुरू : नागरिकांना नाहक त्रास, उर्वरित काम त्वरित करण्याची मागणी

आॅनलाईन लोकमत
अमरावती : विनायकनगर, राधानगर व गाडगेनगर परिसरात नवीन पाईपलाईन टाकल्यानंतर खड्डे बुजविण्यात येत आहे. मात्र, या ठिकाणी पूर्वीची जुनी पाईपलाईनचे काय, असा सवाल नागरिकांचा असून जुनी पाईपलाईन काढण्यात येणार की तशीच ठेवणार या बदलही नागरिकांच्या मनात संदेह निर्माण झाला आहे.
नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी जेवढा खर्च येतो, त्याच्या अर्धा खर्च जुनी पाईपलाईन काढण्यासाठी येत असल्याची माहिती आहे. प्राधिकरण विभागातर्फे शुक्रवार व शनिवारी नवीन पाईपलाईन टाकताना बीएसएनएलचे केबल तोडण्यात आल्याचा प्रकार 'लोकमत'ने उघडकीस आणला होता. याची तत्काळ दखल घेऊन नवीन केबल टाकण्याचे काम करण्यात आल्याचीही माहिती आहे. ब्रेकींग मशीनच्या सहायाने सदर कामे करताना मोठा आवाज होत आहे. या कर्कश्श आवाजाने नागरिक त्रस्त झाले होते. हा प्रकार 'लोकमत'ने लोकदरबारात मांडल्यानंतर सदर कंत्राटदाराने उर्वरित काम शनिवार पासून बंद केले. पण, काम अर्धवट सोडणे हेदेखील नियमसंगत नसून जीवन प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली. कामे पूर्ण करताना कर्कश्श आवाजाचे जनरेटर, ब्रेकींग मशीनचा वापर करू नये, अशीही मागणी करण्यात आली आहे.
मजीप्राद्वारे पाईपलाईनचे काम सुरू असताना अधिक खोल खोदकाम करण्यात येत आहे. त्यासाठी ब्रेकिंग मशीनचा वापर होत असल्यामुळे लगतच्या घरांना हादरे बसत आहे. त्यामुळे भिंती पडण्याचा धोका निर्माण झाल्याची बाब पुढे आली आहे. सदर काम करताना त्यांच्यावर नियंत्रण कुणाचे, असा सवालही या ठिकाणी उपस्थित करण्यात येत आहे. या ठिकाणी मनपाच्या व जीवन प्राधिकरणच्या अभियंत्यांनी उपस्थित राहून कामे सुस्थितीत करून घ्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. काही ठिकाणी नवीन पाईपलाईन उघड्यावर ठेवण्यात आल्याने या ठिकाणाहून पाईप चोरीला जाण्याचीही शक्यता नाकारता येत आहे. पाईपलाईन टाकल्यानंतर तेथील माती सपाट करून रस्ते पूर्ववत करून दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या ठिकाणी कामेसुद्धा मंद गतीने करण्यात येत असल्यामुळे कामाचे नियोजन बिघडल्याचे दिसून येत आहे. परिणामी वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.
लोकांनी जावे कसे ?
गाडगेनगरातील नामदेव महाराज मंदिरापासून शिवसेना गल्लीत पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले आहे. त्या ठिकाणी ११ फुटांचा रस्ता असतानाही पाच ते सहा फुटांपर्यंत खोदकाम केलेली माती तशीच पडून आहे. त्यामुळे लोकांनी ये-जा कशी करावी व वाहने कशी काढावी, असा प्रश्न येथील नागरिकांना सतावत आहे. या ठिकाणी रविवारी पाहणी केली असता नागरिक स्वत: माती हटविताना दिसून आले. या ठिकाणी खोदकाम करताना जुनी पाईपलाईन फुटल्यामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे.

माझ्या घरानजीक पाईपलाईन टाकण्यासाठी रस्ता खोदण्यात आले. त्यातील एक खड्डा बुजविलाच नाही. त्यामुळे त्यात कुणी पडून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
- विजय देशमुख,
नागरिक, विनायकनगर

या ठिकाणी खोदकाम केल्यानंतर सहा फुटांपर्यंत माती तशीच ठेवण्यात आली आहे. आम्ही या ठिकाणावरून वाहने कशी काढावी हा प्रश्न आहे. कामांवर कुणाचेही लक्ष नाही.
- विनायक रडगे,
नागरिक , गाडगेनगर

Web Title: Patchwork, what is the old pipeline removal?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.