चिमुकल्यांच्या हातातील पाटी-पेन्सील कालबाह्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:15 AM2021-08-23T04:15:15+5:302021-08-23T04:15:15+5:30
भातकुली : साधारणपणे एका दशकांपूर्वी प्रत्येक विद्यार्थ्याचा शिक्षणाचा श्रीगणेशा पाटी-पेन्सीलनेच होत असे. आता तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगात ऑनलाईन शिक्षणाला गती ...
भातकुली : साधारणपणे एका दशकांपूर्वी प्रत्येक विद्यार्थ्याचा शिक्षणाचा श्रीगणेशा पाटी-पेन्सीलनेच होत असे. आता तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगात ऑनलाईन शिक्षणाला गती आली आहे. शिक्षणात अनेक आमूलाग्र बदल झाले आहेत. आता शिक्षणाला नवीन तंत्रज्ञानाची जोड देण्यात येत आहे.
काही वर्षांपासून तर संगणक मोबाईल आणि टॅबलेटवरच शिक्षणाचे धडे गिरविले जात आहेत. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये संगणक, प्रोजेक्टर आदींचा वापर केला जात आहे. ग्रामीण, शहरी भागातील विद्यार्थ्यांना एकसमान ऑनलाईन शिक्षण मिळत असून, पाटीची जागा मोबाईलच्या की-पॅडने घेतली आहे. पहिल्या वर्गात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांचा श्रीगणेशादेखील मोबाईलवरच होऊ लागला आहे. तथापि, वर्षानुवर्षाच्या कनेक्टिव्हिटीच्या खंडामुळे ऑनलाईन शिक्षणप्रणाली ग्रामीण भागात नेटवर्कचा अडसर ठरत आहे.
--------------------
अभ्यास करण्यासाठी आज नवनवीन साधने उपलब्ध आहेत. टॅब, संगणक, प्रोजेक्टर या साधनांचा वापर करून शाळेत शिक्षण दिले जात आहे. नवीन शैक्षणिक पद्धतीमुळे दप्तरमधील पाटी-पेन्सील कालबाह्य होत आहे.
- दिलीप वऱ्हेकर, शिक्षक
कोट
पूर्वी विविध पद्धतीच्या पाट्या विक्रीसाठी बाजारात असायच्या. परंतु, आता शिक्षणपद्धती बदलली आहे. परिणामी पाटीला मागणीदेखील कमी झाली आहे. त्यामुळे बहुतांश विक्रेते पाट्या विक्रीसाठी ठेवत नाही.
- गणेश डगवाळे, शालेय साहित्य विक्रेते