सुपर स्पेशालिटी येथे रुग्णाची आत्महत्या, मुत्रपिंडाच्या आजाराने होता त्रस्त, चादरीच्या सहाय्याने घेतला गळफास  

By उज्वल भालेकर | Published: September 28, 2022 01:45 PM2022-09-28T13:45:54+5:302022-09-28T13:46:31+5:30

Crime News: विभागीय सेवा संदर्भ रुग्णालय सुपर स्पेशालिटी येथे एका रुग्णाने आत्महत्या केल्याची घटना पहाटे साडेचारच्या सुमारास घडली. सुरेश माकोडे असे आत्महत्या करणाऱ्या रुग्णाचे नाव आहे

Patient commits suicide at super specialty, suffering from kidney disease, hangs himself with a sheet | सुपर स्पेशालिटी येथे रुग्णाची आत्महत्या, मुत्रपिंडाच्या आजाराने होता त्रस्त, चादरीच्या सहाय्याने घेतला गळफास  

सुपर स्पेशालिटी येथे रुग्णाची आत्महत्या, मुत्रपिंडाच्या आजाराने होता त्रस्त, चादरीच्या सहाय्याने घेतला गळफास  

Next


अमरावती: विभागीय सेवा संदर्भ रुग्णालय सुपर स्पेशालिटी येथे एका रुग्णाने आत्महत्या केल्याची घटना पहाटे साडेचारच्या सुमारास घडली. सुरेश माकोडे (वय ५५, रा. घाटलाडकी, ता. चांदूर बाजार) असे आत्महत्या करणाऱ्या रुग्णाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनूसार सुरेश माकोडे हे किडनीच्या मुत्रपींड आजाराने त्रस्त होते. घाटलाडकी येथे रुग्णालयात दाखवले असता, त्याच्या मुत्राश्त्रयातून रक्तस्त्राव झाला होता. त्यामुळे त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले होते. याठीकाणी तपासणीनंतर त्याला मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास सुपरमध्ये हलविण्यात आले होते. यावेळी त्यांच्या सोबत मुलगा होता. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर रात्रीला रुग्णालयातील एमओ यांनी त्यांची तपासणी करुन, सुरेश माकोडे यांचा त्रास कमी केला होता. त्यामुळे ते चालते फिरते झाले होते. तसेच सकाळी त्यांच्यावर शस्त्रक्रीयाही होणार असल्याने रुग्णालयातील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या वार्डात त्यांना १.५५ वाजता भरती करण्यात आले होते. यानंतर रुग्णालयातील इतर रुग्णाला पाहण्याकरीता एमओ खाली गेले असता, सुरेश माकोडे यांनी बुधवारी पहाटे साडेचारच्या सुमारास बेडवरील चादर सोबत घेऊन रुग्णालयातील ग्रीलला ती बांधून आत्महत्या केल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. सुरेश माकोडे यांचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयातील शवविच्छेदानासाठी ठेवण्यात आला आहे.

सुरेश माकोडे हे रात्री मंगळवारी साडेअकराच्या सुमारास रुग्णालयात दाखल झाले होते. यावेळी त्यांच्यावर तत्काळ उपचार करुन त्यांचा त्रास कमी करण्यात आला होता. त्यामुळे ते चालते फिरते झाले होते. सकाळी त्यांच्यावर शस्त्रक्रीया देखील होणार होती. त्यामुळे त्यांना वार्डात दाखल केले होते. परंतु त्यांनी रुग्णालयातील ग्रीलला चादरने गळफास घेतला. शवविच्छेदनासाठी त्यांचा मृतदेह जिल्हासामान्य रुग्णालयात पाठविला आहे.
डॉ. अमोल नरोटे, एम.एस., सुपरस्पेशालीटी

Web Title: Patient commits suicide at super specialty, suffering from kidney disease, hangs himself with a sheet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.