रुग्णाचे हॉस्पिटलमधून पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:28 AM2021-09-02T04:28:24+5:302021-09-02T04:28:24+5:30

---------------------- ‘मी तुला खोट्या केसमध्ये फसवेन’ अमरावती : श्यामनगर येथील जिजाऊ अपार्टमेंटमध्ये एका महिलेकडे पाहून शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीने मी ...

The patient escaped from the hospital | रुग्णाचे हॉस्पिटलमधून पलायन

रुग्णाचे हॉस्पिटलमधून पलायन

Next

----------------------

‘मी तुला खोट्या केसमध्ये फसवेन’

अमरावती : श्यामनगर येथील जिजाऊ अपार्टमेंटमध्ये एका महिलेकडे पाहून शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीने मी तुला खोट्या प्रकरणात फसवेन आणि येथे राहू देणार नाही, अशी धमकी दिली. अश्लील शिवीगाळ करीत त्याने महिलेशी गैरवर्तन केले. याप्रकरणी पोलिसांनी शैलेंद्र वरठे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

----------------------

युवकाने दिली आत्महत्येची धमकी

अमरावती : राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील योगक्षेम कॉलनी येथे सतीश सुदाम गाजलेकर याने शेजारी राहणाऱ्या शुभम दिलीप काळे याच्या घरापुढे शिवीगाळ केली व आत्महत्येची धमकी दिली. माझी पत्नी, मुले तुमच्यामुळे सोडून गेली. मला त्यांचा पत्ता सांगा, असे म्हणत त्याने काळे कुटुंबाशी वाद घातला. त्यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

-----------------

वाहनाचा वाहतुकीस अडथळा

अमरावती : कोल्हापूर पोलिसांनी रस्त्यात अडथळा होईल अशा पद्धतीने कार लावल्याबद्दल रईस खान साहेब खान (३१) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.

-------------------

महिलेला जिवे मारण्याची धमकी

अमरावती : फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील व्यंकय्यापुरा येथे अडीच वर्षाच्या मुलाला दमदाटी करणाऱ्या महिलेला दिनेश श्रीराम पांडे (रा. व्यंकय्यापुरा) याने वायपरच्या लोखंडी पाईपने मारले व जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

--------------

संशयिताला अटक

अमरावती : शहर कोतवाली पोलिसांनी राजकमल चौकातून शाहरुख खान (२६, रा. शेगाव) याला ताब्यात घेतले. अंधारात त्याच्या हालचाली संशयास्पद होत्या. त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

-------------

दोन लाख, चार एकर शेतीसाठी विवाहितेचा छळ

नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील जावरा मोळवन येथील २८ वर्षीय विवाहितेचा माहेरहून दोन लाख रुपये व चार एकर शेती नावावर करण्यासाठी छळ करण्यात आला. याशिवाय सासरची मंडळी चारित्र्यावर संशय घेत असल्याचे तिने नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीत नमूद केले. पोलिसांनी दीपक विश्वनाथ थोरात, प्रदीप विश्वनाथ थोरात व एका महिलेविरुद्ध गुन्हा नोंदविला.

Web Title: The patient escaped from the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.