पथ्रोट पोलिसांनी सागवान पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 01:32 AM2019-07-11T01:32:58+5:302019-07-11T01:33:43+5:30
पथ्रोट पोलिसांनी बुधवारी पहाटे बोराळा-परसापूर रस्त्यावर सागवान लाकूड पकडले. जमादार सुनील पवार गस्तीवर असताना दुचाकीवरून आरोपी सागवान लाकूड नेत असल्याचे आढळून आले.
परतवाडा : पथ्रोट पोलिसांनी बुधवारी पहाटे बोराळा-परसापूर रस्त्यावर सागवान लाकूड पकडले. जमादार सुनील पवार गस्तीवर असताना दुचाकीवरून आरोपी सागवान लाकूड नेत असल्याचे आढळून आले. यात आरोपी सुरेश गाठे व अंकुश पवार (रा. गोंडवाघोली) यांना अटक करून दुचाकीसह सागवान लाकडाच्या नऊ चरपटा पोलिसांनी ताब्यात घेतल्यात.
घटनेची माहिती परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना देत प्रकरण पोलिसांनी वनविभागाकडे वर्ग केले. वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप भड यांच्या मार्गदर्शनात दर्यापूर वर्तुळाचे वनपाल डी.बी. सोळंके, वनरक्षक एस.बी. बरवट, आर.बी. धुमाळे, शिवम बछले, नितीन अहिरराव, पी.बी. निर्मळ यांनी जप्त मालाचा पंचनामा करून आरोपींविरुद्ध वनगुन्हा दाखल केला. आरोपींसह माल व दुचाकी पथ्रोटहून परतवाडा वनपरिक्षेत्र कार्यालयात जमा करण्यात आली.
ब्राह्मणवाडा थडी येथील पकडलेल्या सागवान लाकडाचे प्रकरण ताजे असतानाच चौथ्या दिवशी पथ्रोट पोलिसांनी आपल्या क्षेत्रात ही कारवाई केली.
पकडलेले आरोपी गोंडवाघोलीचे असून, ब्राह्मणवाडा थडीप्रमाणेच गोंडवाघोलीदेखील सागवान लाकडाच्या तस्करीचे एक प्रमुख केंद्र बनले आहे. अंजनगाव वनपरिक्षेत्राशी ते जोडले गेले आहे.