पाल दिसली, कीटक कसे दिसणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2016 12:08 AM2016-09-27T00:08:35+5:302016-09-27T00:08:35+5:30

मनभरीच्या चिवड्यात पाल आढळून आल्याने दाभा येथील ओमजी नमकीनच्या कारखान्यात पालीचा वावर असल्याचे स्पष्ट होत आहे.

Paul looks, how will the pest appear? | पाल दिसली, कीटक कसे दिसणार ?

पाल दिसली, कीटक कसे दिसणार ?

googlenewsNext

विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह : चिवड्याचे पाकीट 'रिकॉल' केव्हा होणार ?
अमरावती : मनभरीच्या चिवड्यात पाल आढळून आल्याने दाभा येथील ओमजी नमकीनच्या कारखान्यात पालीचा वावर असल्याचे स्पष्ट होत आहे. पालीचे जीवन कीटकांवर अवलंबून असल्यामुळे कारखान्यात कीटकांचाही वावर असल्याचे सिध्द होते. चिवड्यातील पाल आकाराने मोठी असल्याने दृष्टीस पडली. मात्र, अत्यंत लहान आकाराचे कीटक कसे दिसणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एफडीएने चिवड्याचा माल 'रिकॉल' करण्यास संचालकाला सांगितले आहे. मात्र, अद्यापपर्यंत तो रिकॉल झाला नाही.
विजय नगरातील विमल चुडे या महिलेने घेतलेल्या मनभरी चिवड्याच्या पाकिटात पाल आढळून आल्यानंतर एफडीए अधिकाऱ्यांनी मनभरीच्या ओमजी नमकीन कारखान्यावर धाड टाकून तेथील व्यवस्थेची पाहणी केली. पाल कारखान्यात शिरण्याचे मार्ग शोधले. एका जागेवरून पाल आत येऊ शकते, ही बाब निश्चित केली. पाल ही वीज दिव्यांच्या अवतीभोवती असणाऱ्या कीटक खाऊन जगते. दिव्याच्या अवतीभोवती शेकडो कीटक फिरतात. अख्खी पाल तळली जाऊ शकते, तर शेकडो कीटक चिवड्यात जाणेही शक्य आहे. चिवडा तयार करताना मुरमुरे, फुटाणे, दाणे टाकून एकत्रित तळण्यात येतात. या मिश्रणात गेलेल्या पालीकडेच जर कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केले तर चिवड्यातील कीटकांकडे लक्ष देणार तरी कोण, अशी स्थिती कारखान्यातील व्यवस्थेवरून दिसून येत आहे.
पाल ही सर्व प्रकारचे कीटक खात असून तिच्या खाण्यात विषारी व दुर्गंधीयुक्त कीटक असतात. चिवडा बनविताना अख्खी पाल जर मिश्रणात तळली जाऊ शकते, तर चिवड्यात शेकडो कीटकही कसे बरे तळले गेले नसावेत, असा प्रश्न उपस्थित होतो. एकाचवेळी चिवड्याची हजारो पाकिटे पॅक केली जातात. ज्या चिवड्यात पाल आढळून आली, तोच चिवडा अनेक पाकिटात भरला गेला. मनभरीचा चिवडा विदर्भातील अनेक प्रतिष्ठानांतून विक्री केला जातो. हजारो ग्राहकांनी तो विश्वासाने खरेदी केला असावा. विक्री झालेल्या चिवड्याचे हजारो पाकिटे आजही बाजारपेठेत विक्रीस उपलब्ध आहेत. सदर बाधित चिवडा अद्यापही परत बोलविला गेला नाही. यातून कुणाच्या आरोग्य धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

चिवड्यात तळलेल्या अवस्थेत आढळलेल्या पालीसंदर्भात अद्याप कुणीही माझ्याशी संपर्क केला नाही. असले जीवघेणे प्रकारावर अन्न, औषध प्रशासनाने योग्य कारवाई करणे अपेक्षित आहे.
- विमल चुडे, ग्राहक, विजयनगर

Web Title: Paul looks, how will the pest appear?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.