पेपर तपासणीचे मानधन त्वरित द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 09:52 PM2018-05-12T21:52:57+5:302018-05-12T21:52:57+5:30
इयत्ता १० व १२ वीच्या फेब्रुवारी- मार्च २०१८ च्या परीक्षांचे पेपर तपासणीचे मानधन शिक्षकांच्या खात्यात त्वरित जमा करण्यात यावे, अशी मागणी शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक अमरावती विभागीय परीक्षा मंडळाचे अध्यक्ष महेश करजगावकर यांच्याकडे केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : इयत्ता १० व १२ वीच्या फेब्रुवारी- मार्च २०१८ च्या परीक्षांचे पेपर तपासणीचे मानधन शिक्षकांच्या खात्यात त्वरित जमा करण्यात यावे, अशी मागणी शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक अमरावती विभागीय परीक्षा मंडळाचे अध्यक्ष महेश करजगावकर यांच्याकडे केली.
या आशयाचे निवेदन सहायक सचिव धुर्वे यांच्यामार्फत मंडळाच्या अध्यक्षांना दिले आहे. यावेळी शिक्षक महासंघाचे अमरावती जिल्हा अध्यक्ष मनोज कडू, उपाध्यक्ष पी. आर.ठाकरे, प्रवीण कराळे आदी उपस्थित होते. इयत्ता १० व १२ वीच्या फेब्रुवारी-मार्च २०१८ च्या परीक्षांचे पेपर तपासणीचे काम विभागातील शिक्षकांनी चोखपणे पार पाडले आहे. आता फक्त विद्यार्थ्यांच्या निकालाची प्रतीक्षा लागलेली आहे.
पेपर तपासणीचे मानधन हे परीक्षा मंडळाकडे जमा होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कामधून अदा केले जाते. विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क हे मंडळाकडे ६-८ महिन्यांपूर्वीच जमा झालेले असल्याने त्यामधून मानधन अदा करावे, अशी मागणी शेखर भोयर यांनी केली आहे.