भरणा २४ कोटींचा, भरपाई १० कोटींची

By admin | Published: May 7, 2017 12:05 AM2017-05-07T00:05:18+5:302017-05-07T00:05:18+5:30

पिकांचा ७० टक्के जोखीमस्तर देय असणाऱ्या पंतप्रधान पीक विमा योजनेत खरीप २०१६ करिता २ लाख ४० हजार ३९४ शेतकऱ्यांना सहभाग नोंदविला....

Payment of 24 crores, compensation up to 10 crores | भरणा २४ कोटींचा, भरपाई १० कोटींची

भरणा २४ कोटींचा, भरपाई १० कोटींची

Next

पीक विमा जाहीर : खरिप २०१६ साठी सोयाबीन, उडीद, ज्वारी पिकांना मदत
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पिकांचा ७० टक्के जोखीमस्तर देय असणाऱ्या पंतप्रधान पीक विमा योजनेत खरीप २०१६ करिता २ लाख ४० हजार ३९४ शेतकऱ्यांना सहभाग नोंदविला व २४ कोटी ३६ लाख ३२ हजारांचा प्रीमियम भरला. आता भरपाई जाहीर झाली. यामध्ये जिल्ह्यास सोयाबीन, उडीद व ज्वार पिकासाठी १० कोटी २ लाखांची भरपाई मिळणार आहे. कंपनीद्वारा ७ कोटी ९७ लाख ८८ हजार २७८ कोटी रुपये जिल्ह्यास उपलब्ध केले आहेत.
गतवर्षीच्या खरीप हंगामापासून प्रचलित दोन पीक विमा योजना रद्द करण्यात येऊन ७० टक्के जोखीमस्तर देय असणारी पंतप्रधान पीक विमा योजना राबविण्यात आली. नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पूर, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड, रोग तसेच पीक पेरणीपूर्व व काढणी पश्चात नुकसान आदी कारणांनी पिकांचे नुकसान झाल्यास संरक्षण कवच मिळते. त्यानुसार जिल्ह्यात १ लाख ५६ हजार ४५४ कर्जदार व १ लाख २६ हजार ५६१ बिगर कर्जदार अशा २ लाख ८३ हजार १५ शेतकऱ्यांनी विम्यात सहभाग नोंदविला होता व कर्जदार शेतकऱ्यांचे १ लाख ६७ हजार २५० हेक्टर व बिगर कर्जदार शेतकऱ्यांचे १ लाख १९६ हेक्टर असे २,६७,४४७ हेक्टर क्षेत्र संरक्षित करण्यात आले.

अशी होते भरपाई निश्चित
अमरावती : या पीक विम्यासाठी कर्जावर शेतकऱ्यांनी ५६३ कोटी ८१ लाख ६० हजार ३१६ रूपये व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी ३३० कोटी २५ लाख ९४ हजार ८६ रुपयांची रक्कम अशी एकूण ८९४ कोटी ७ लाख ५४ हजार ४०२ रूपये रकम विमा संरक्षित केली होती. यासाठी कर्जदार शेतकऱ्यांनी १७ कोटी २७ लाख २२ हजार ३२९ रुपये व गैरकर्जदार शेतकऱ्यांनी ७ कोटी ३७ लाख २४ हजार ५५७ असे एकूण २४ कोटी ५४ लाख ४६ हजार ८८६ कोटी रुपयांचा प्रिमीयमचा भरणा केला होता. जिल्ह्यात १० कोटी २ लाख १४ हजारांची पीक विमा भरपाई मिळणार आहे. यामध्ये ७ कोटी ९७ लाख ८८ हजार २७८ रुपये उपलब्ध करण्यात आले आहे. यामध्ये ज्वारीसाठी तीन लाख २६ हजार ८६३ रुपये, उडीदसाठी दोन हजार २२६ रुपये व सोयाबीन पिकासाठी ७ कोटी ९७ लाख ८८ हजार २७८ रुपये उपलब्ध करण्यात आले आहे. राज्य सरकारकडून पिकांच्या सरासरी उत्पन्नाची आकडेवारी प्राप्त झाल्यानंतर विमा कंपन्यामार्फत उंबरठा उत्पन्न चालू वर्षाचे सरासरी उत्पन्न याची विचारणा केल्यानंतर तीन आठवड्याच्या आत भरपाई निश्चित केल्या जाते. यामध्ये उंबरठा उत्पन्न वजा प्रत्यक्ष झालेले सरासरी उत्पन्न भागिले उंबरठा उत्पन्न व गुणीले विमा संरक्षित रक्कम भरपाई निश्चित करण्याचे सूत्र आहे.

नांदगाव तालुक्यात सोयाबीनची ९.९८ कोटी भरपाई
जिल्ह्यातील एक लाख १९ हजार १८४ शेतकऱ्यांनी एक लाख ४४ हजार ६४० हेक्टर सोयाबीन क्षेत्रासाठी १० कोटी ४१ लाख ७ हजार ४५५ रुपयांचा विमा हप्ता भरणा केला होता. प्रत्यक्षात नांदगाव तालुक्यातील दाभा मंडळात एक कोटी ७५ लाख ७२ हजार ७१ रूपये, धानोरा गुरव मंडळात ६ लाख ११ हजार ६३७, लोणी दोन कोटी २२ लाख ५८ हजार ७९७, माहुली चोर दोन कोटी २५ लाख ९१ हजार ५६६, मंगरुळ चव्हाळा एक कोटी ९२ लाख ४६ हजार ९६६, नांदगाव पाच लाख ९१ हजार ४२९, पापळ सात लाख ८८ हजार ६५१ व शिवणी मंडळात एक कोटी ६२ लाख ११ हजार ५४५ रुपयांची भरपाई जाहीर करण्यात आली.

ज्वारी, उडीदसाठी ३.४२ लाखांची भरपाई
ज्वारी पिकासाठी ३,२९,६५० रुपयांचा विमा जाहीर करण्यात आला. यामध्ये अचलपूर तालुक्यातील असदपूर मंडळात ३,९१९ रुपये, परसापूर मंडळात २३,८३६, पथ्रोट १४,२६१, रासेगाव ७,८२७, कापूसतळणी ६१ हजार १७८, कोकर्डा ५९,९५६, दारापूर ६५,८४२ व खल्लार मंडळात ९२ हजार ८३१ रूपये भरपाई मिळणार आहे. उडीदासाठी फक्त धारणी तालुक्यात ११,७४० रुपये भरपाई मिळणार आहे. यामध्ये धारणी मंडळात १,६१९ रूपये, धुळघाट ६०७ रूपये, सावलीखेडा ९,५१४ रुपये भरपाई मिळणार आहे.

Web Title: Payment of 24 crores, compensation up to 10 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.