पॉस यंत्रणाद्वारे कराचा भरणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 01:43 AM2019-07-11T01:43:49+5:302019-07-11T01:44:37+5:30
महापालिकेच्या कर वसुलीतील घोळाला पायबंद बसावा यासाठी आता ‘पॉस’ या यंत्राद्वारे वसुली केली जाणार आहे. यासाठी ५५ यंत्राची खरेदी करण्यात आले व सबंधीत कर्मचाऱ्यांना दोन दिवस प्रशिक्षणदेखील देण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महापालिकेच्या कर वसुलीतील घोळाला पायबंद बसावा यासाठी आता ‘पॉस’ या यंत्राद्वारे वसुली केली जाणार आहे. यासाठी ५५ यंत्राची खरेदी करण्यात आले व सबंधीत कर्मचाऱ्यांना दोन दिवस प्रशिक्षणदेखील देण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.
महापालिकेच्या कारभारात वसुलीच्या प्रकारात अनावधानाने झालेल्या चुका किंवा केलेला घोळ यासाठी आता ‘पॉस’ या यंत्राची मदत घेतली जाणार आहे. याद्वारे कराचा भरणा केल्यानंतर बºयाच दिवशी सर्व माहिती आॅनलाइन पद्धतीने महापालिकेच्या सर्व्हरवर साठविली जाणार आहे. त्यामुळे कर वसुलीची प्रक्रिया आता पारदर्शी होणार आहे. यापूर्वी पारंपरिक पद्धतीने कर वसुली करताना बिलात अनेक चुका व्हायच्या. झोननिहाय वसुली लिपिकांच्या पावत्यांची पुन्हा संगणकावर नोंद घ्यावी लागत असे. यासाठीचे कंत्राटी मनुष्यबळ आदीमध्ये पैशांचा अपव्यय व्हायचा. याव्यतिक्त नोंदीतील चुकांमुळेही त्रास व्हायचा. यावर आता महापालिकेने उपाय योजिला आहे.
महापाकिकेचे उपायुक्त व करमुल्यांकन अधिकारी महेश देशमुख यांनी प्रत्येक करवसुली लिपिकास ‘पॉस’ मशीन देण्याचा निर्णय घेतला आहे. कराचा भरणा करण्यासाठी संबंधित लिपिकास आता मालमत्ता क्रमांक टाकावा लागणार आहे. त्यानंतर संबंधित मालमत्तेचे विवरण त्याच्या स्क्रिनवर येईल. कराच्या रकमेची मशीनमध्ये नोंद करतानाच मालमत्ताधारकांना पावती मिळेल.
कामकाज पारदर्शी व गतिमान होण्याच्या दृष्टीने ही पॉस यंत्रणा महत्त्वाची आहे. यासाठी महापालिकेच्या संबंधित कर्मचाऱ्यांना ८ व ९ जुलै रोजी प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. त्यानंतरच या यंत्रणेद्वारे कर वसुलीची अंमलबजावणी केल्या जाणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली. महापालिकेचा उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत असलेला मालमत्ता कराचे यावर्षी सर्वाधिक वसुली मार्च अखेर झाली होती. यंत्रणा अद्ययावत झाल्याने उत्पन्न वाढण्याची आशा आहे.
करवसुलीची प्रक्रिया गतिमान होणार
संबंधित लिपिकाने नोंदविलेल्या करवसुलीनुसार संबंधित झोनमधील क्षेत्रिय अधिकारी लिपिकाजवळून कराची रक्कम जमा करतील व मुख्यालयातील रोखपालाकडे पाठवतील. यामध्ये मनुष्यबळाचा वापर कमी होईल. करवसुलीची प्रक्रियादेखील गतिमान होणार आहे. विशेष म्हणजे, कराचे देयक जमा झाल्याचा ‘एसएमएस’देखील संबंधित मालमत्ताधारकांना मिळणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.