पीकअप वाहन उलटून सात गंभीर, १९ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 10:47 PM2018-03-12T22:47:21+5:302018-03-12T22:47:21+5:30
ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात पिकअप वाहन मालवाहू आॅटोला धडक देऊन उलटल्याची घटना सोमवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास लाखारा लगतच्या राज्य महामार्गावर घडली.
आॅनलाईन लोकमत
वरुड : ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात पिकअप वाहन मालवाहू आॅटोला धडक देऊन उलटल्याची घटना सोमवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास लाखारा लगतच्या राज्य महामार्गावर घडली. या अपघातात १९ जण जखमी झाले असून, सात जण गंभीर आहेत. जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून, यापैकी ७ गंभीर जखमींना अमरावतीत हलविले आहे.
सुरेश हरले (५२), मदन वासुदेव बेलसरे (३८), प्रदीप दारोकर (४८), बाबराव पोकळे (५५), राजेश नामदेव बेहरे (४०), अशोक भगवंत राउत (५५), देवीदास भीमराव सुरजुसे (४१, सर्व रा. जरुड) अशी अपघातात गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहे. तर किरकोळ जखमीमध्ये अनिल देविदास टोंगसे (५०), सुधाकर कोल्हे (४४), ज्ञानेश्वर सहातपुरे (५०), रमेश सहातपूरे (४०), प्रदीप बेले (४६), अनिल अशोक वसूले (३१), अतुल टोंगसे (२८), शालीनी हिवसे (२७),धनराज दंडाळे ( ३३ सर्व रा. जरुड), आकाश उईके (१६), कांताबाइ सुरजूसे (५४), ज्योती सिरसाम (१९ सर्व रा. शहापूर) यांचा समावेश आहे. एम.एच.२७ एक्स ७९६३ हे चारचाकी पिकअप वाहन १८ मजूरांना घेवून जात होते. दरम्यान मालवाहू आॅटो क्रमांक एम.एच.२७ -२२७५ ला पिकअपने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्न केला आणि आॅटोला धडक देऊन पिकअप वाहन उलटले. या अपघातात पिकअप वाहनात बसलेले जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच बेनोडा ठाणेदार शांतीकुमार पाटील यांनी पोलीस ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली. गोलू उर्फ रवि धुर्वे (३० रा. जरुड ) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चालक यशवंत पोकळे याचेविरुध्द गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.