दुचाकीलस्वारासह पादचारी युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:10 AM2021-06-03T04:10:48+5:302021-06-03T04:10:48+5:30

वरूड : स्थानिक रिलायन्स पेट्रोल पंपासमोर मंगळवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात पीक अप टेम्पोने दिलेल्या धडकेत ...

Pedestrian youth killed by two-wheeler | दुचाकीलस्वारासह पादचारी युवक ठार

दुचाकीलस्वारासह पादचारी युवक ठार

Next

वरूड : स्थानिक रिलायन्स पेट्रोल पंपासमोर मंगळवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात पीक अप टेम्पोने दिलेल्या धडकेत त्यावरील स्वारांसह शतपावली करणाऱ्या दोन पादचाऱ्यांना फरफटत नेले. या अपघातात दुचाकीचालकासह एका पादचारी युवकाचा मृत्यू झाला. त्याच्या गंभीर जखमी सहकाऱ्याला नागपुरात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

तुषार वसंत नेहारे (३०, रा . साखरपुरा, वरूड) असे दगावलेल्या पादचाऱ्याचे व प्रदीप रामकिसन नागदिवे (४०, रा . वाडेगाव) असे मृत दुचाकीचालकाचे नाव आहे. तेजस रवींद्र कडू (३१, रा . साखरपुरा, वरूड) हा जखमी झाला आहे. तुषार आणि तेजस हे रात्री जेवण केल्यानंतर रात्री नियमित फिरायला जात होते. मंगळवारी रात्री ते रेस्ट हाऊस चौक ते बस स्थानाकाकडे ते फिरायला गेले. बसस्थानकाकडून कोबी घेऊन अमरावतीकडे जाणारे भरधाव पीक अप वाहन (एमएच ३२ एजे २५९८) ने रिलायन्स पेट्रोल पंपासमोर या दोघांना धडक दिली. ते फरफटतच नेले जात असताना पिकअपने दुचाकी (एमएच २७ एडी ४८९०) ला धडक दिली व त्यानंतर हे वाहन उलटले. अपघातात गंभीर जखमी झालेले दुचाकीचालक प्रदीप नागदिवे, तुषार व तेजसला नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रदीप नागदिवे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला, तर तुषारचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. गंभीर जखमी तेजसला उपचाराकरिता नागपूरला पाठविण्यात आले. वरूड पोलिसांनी पीक टेम्पोच्या चालक दिनेश परळकर (रा. पंधराखेडी, मध्यप्रदेश) याच्याविरुद्ध अपघातास कारणीभूत ठरल्याचा गुन्हा प्रथमदर्शनी नोंदविला व त्याला अटक केली. पुढील तपास ठाणेदार प्रदीप चौगावकर सह करीत आहे .

पोलीस ठाण्याचा दूरध्वनी बंद

अपघात झाल्यानंतर अनेकांनी पोलीस ठाण्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र, दूरध्वनी बंद असल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता. अखेर सहायक पोलीस निरीक्षक सुनील पाटील ताफ्यासह पोहोचल्याने तणाव निवळला.

सामाजिक कार्यकर्त्यांची तत्परताअपघातात जखमी तिघांना हात लावण्यासही कुणी धजावत नव्हते, मात्र मोबाईलमध्ये छायाचित्रे घेतली जात होती. अशावेळी योगेश ठाकरे, प्रकाश गडवे, बाळासाहेब मगर्दे, राजेंद्र भुयार यांनी रुग्णवाहिका मागितली व जखमींना रुग्णालयात पोहचविले.

Web Title: Pedestrian youth killed by two-wheeler

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.