पेढी नदीपात्रात आमला येथील गुराखी वाहून गेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:17 AM2021-09-06T04:17:17+5:302021-09-06T04:17:17+5:30
भातकुली : तालुक्यातील आमला येथील गुराखी रविवारी पेढी नदीपात्रात वाहून गेल्याची घटना उघड घडली. जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या मार्गदर्शनात ...
भातकुली : तालुक्यातील आमला येथील गुराखी रविवारी पेढी नदीपात्रात वाहून गेल्याची घटना उघड घडली. जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या मार्गदर्शनात आपत्कालीन पथकाने अंधार होईस्तोवर त्याचा शोध घेतला. परंतु, ते मिळून आले नाही.
सूत्रानुसार, राजेश रामराव वानखडे (५३) असे वाहून गेलेल्या गुराख्याचे नाव आहे. ते रविवारी गुरे चारत असताना अचानक पाय घसरल्याने वाहत्या पाण्यात पडले. याची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळताच रेस्क्यू पथकाला पाचारण करण्यात आले. त्याचा शोध लागला नाही. सोमवारी सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. घटनास्थळी जिल्हाधिकारी पवनीत कौर, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा शोध व बचाव पथकाने शोधकार्य आरंभला. परंतु, रात्र झाल्यामुळे आता सोमवारी सकाळी १०.३० वाजता पुन्हा शोध बचाव कार्य सुरू करण्यात येईल, अशी माहिती तहसीलदारांनी दिली.