नियमांचे पालन करत नसल्यास दंडात्मक, फौजदारी कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:37 AM2021-02-20T04:37:19+5:302021-02-20T04:37:19+5:30
अमरावती : नियमांचे पालन करत नसल्यास दंडात्मक व फौजदारी कारवाईचे निर्देश महापालिका आयुक्तांनी शुक्रवारी संबंधित यंत्रणेला दिले. नागरिकांनीही ...
अमरावती : नियमांचे पालन करत नसल्यास दंडात्मक व फौजदारी कारवाईचे निर्देश महापालिका आयुक्तांनी शुक्रवारी संबंधित यंत्रणेला दिले. नागरिकांनीही सद्यस्थिती लक्षात घेता दक्षता पाळणे फार महत्त्वाचे आहे.
कोव्हीड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यांच्या अनुषंगाने स्वच्छता विभागाव्दारे १ ते १८ फेब्रुवारीपर्यंत १ लाख ९० हजार ६०० रुपये दंड वसूल करण्यात आला. मास्क न लावणे, सोशल डिस्टन्स न पाळणे यासाठी हा दंड आकारण्यात आला आहे. बाजार व परवाना विभाग व पशुशल्य चिकित्सक विभाग यांच्यामार्फत लॉन, मंगल कार्यालयांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. शहरातील १८ मंगल कार्यालयांवर १२ ते १६ फेब्रुवारी दरम्यान दंडात्मक कारवाई करण्यात आली. खंडेलवाल लॉन २० हजार, बेबी पर्ल मंगल कार्यालय १० हजार, तेलाई मंगल कार्यालय ७० हजार, राजवाडा मंगल कार्यालय १० हजार, बालाजी मंगल कार्यालय १० हजार, शहनाई मंगल कार्यालय ३० हजार, प्रभादेवी मंगल कार्यालय १५ हजार, कमल प्लाजा २० हजार, सिध्दार्थ मंगलम ३० हजार, कांचन रिसॉर्ट ५० हजार दंड वसूल करण्यात आला आहे. लाली लॉन २ लाख ५० हजार, व्हाईट हाऊस लॉन २ लाख ५० हजार, नेमाणी ईन ८० हजार, कल्पदिप मंगल कार्यालय १ लाख, ताज पॅलेस २ लाख ५० हजार, रॉयल पॅलेस २ लाख ५० हजार, आलीशान पॅलेस २ लाख ५० हजार, पाकीजा हॉल २ लाख ५० हजार रुपयांची दंडात्मक नोटीस देण्यात आली आहे.