वाहनांचे फिटनेस सर्टिफिकेट नसेल, तर दरदिवशी ५० रुपये दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2022 12:14 PM2022-04-11T12:14:05+5:302022-04-11T12:26:24+5:30

रस्त्यावर धावणारे वाहन हे सुरक्षित असणे आवश्यक आहे. अन्यथा बिघाड असलेल्या वाहनांमुळे मोठा अपघात हाेऊन जीवितहानी होण्याचा धोका असतो. बरेच वाहनचालक देखछाल दुरूस्तीकडे डोळेझाक करतात. त्यासाठीच फिटनेस प्रमाणपत्र आहे.

Penalty of Rs. 50 per day if the vehicle does not have fitness certificate | वाहनांचे फिटनेस सर्टिफिकेट नसेल, तर दरदिवशी ५० रुपये दंड

वाहनांचे फिटनेस सर्टिफिकेट नसेल, तर दरदिवशी ५० रुपये दंड

googlenewsNext
ठळक मुद्देप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची कारवाईवर्षभरात ५६ लाखांचा दंड वसूल

अमरावती : महामार्ग, राज्यमार्ग असो, वा रस्त्यावर धावणारे वाहन, ते तांत्रिकदृष्ट्या योग्य असणे आवश्यक आहे. वाहनांमध्ये छोटासाही बिघाड मोठे संकट ठरू शकते. विशेष करून प्रवासी व मालवाहू वाहनांची फिटनेस तपासणी सक्तीने करणे आवश्यक आहे. ट्रॅव्हल्स, एसटी बसेस ही वाहने लांब पल्ल्याचा प्रवास करतात. त्यामुळे या वाहनांची नियमित देखभाल, दुरुस्ती आवश्यक आहे. बिघाड असलेले वाहन रस्त्यावर धावू लागले, तर यातून सर्वांनाच धोका निर्माण होऊ शकतो.

वाहनांची फिटनेस तपासणी आरटीओ कार्यालयातील ट्रॅकवर इन कॅमेरा केली जाते. वाहनांच्या हॅन्डब्रेकपासून ते लाईट, टायर व इतर तांत्रिक बाबी अधिकारी तपासतात. नंतरच फिटनेस प्रमाणपत्र दिले जाते. एकप्रकारे वाहनांची रस्त्यावर योग्यता प्रमाणपत्र हे आवश्यक मानले जाते. वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र नसल्यास पाच हजार रुपये दंड आकारला जातो. त्यानंतर तर दरदिवशी ५० रुपये याप्रमाणे दंड वसूल केला जातो.

कोणत्या वाहनाला किती दंड...

- प्रवासी व मालवाहू वाहनांना फिटनेस नसल्यास पाच हजार रुपये दंड आकारला जातो. त्यातून नागरिक प्रवास करीत असल्याने जीविताला धोका सर्वाधिक संभवतो. यासाठीच प्रमाणपत्राची सक्ती आहे.

- याशिवाय वेळेत फिटनेस प्रमाणपत्र न काढल्यास प्रति दिवस ५० रुपये याप्रमाणे लेट फी म्हणून दंड वसूल केला जातो.

फिटनेस प्रमाणपत्र कशासाठी?

रस्त्यावर धावणारे वाहन हे सुरक्षित असणे आवश्यक आहे. अन्यथा बिघाड असलेल्या वाहनांमुळे मोठा अपघात हाेऊन जीवितहानी होण्याचा धोका असतो. बरेच वाहनचालक देखछाल दुरूस्तीकडे डोळेझाक करतात. त्यासाठीच फिटनेस प्रमाणपत्र आहे.

हे प्रमाणपत्र कोणाला आवश्यक?

- फिटनेस प्रमाणपत्र हे व्यावसायिक वापरासाठी असलेल्या वाहनांना आवश्यक आहे.

- यामध्ये टुरीस्ट टॅक्सी, ऑटोरिक्षा, बस, ट्रक यांचा समावेश आहे.

हे प्रमाणपत्र कसे काढणार?

- वाहनधारकांनी वाहनांची योग्य देखभाल दुरूस्ती करावी,

-वाहन तपासणीसाठी ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी.

- आरटीओ अधिकारी ट्रॅकवर वाहनांची ट्रायल घेतात.

वाहनचालक व मालकाच्या सुरक्षिततेसाठी वाहनाचे फिटनेस करवून घेणे आवश्यक आहे. तसे न केल्यास दंडात्मक कारवाई केली जाते.

- सिद्धार्थ ठाेके, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अमरावती.

 

२०२१ मध्ये ५६ लाखांचा दंड वसूल

येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या मार्गदर्शनात सन २०२१ मध्ये फिटनेस नसणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला गेला. जवळपास ३० लाख ५८ हजारांचा दंड प्रतिवाहन याप्रमाणे वसूल करण्यात आला. यातून मोठी रक्कम जमा झाली.

यंदा तीन महिन्यात साडेचार लाख वसूल

चालू वर्षातील जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीत वाहनांची तपासणी केली असता, ज्यांच्याकडे फिटनेस प्रमाणपत्र नाही, अशांकडून साडेचार लाखांचा दंड वसूल करण्यात आला.

Web Title: Penalty of Rs. 50 per day if the vehicle does not have fitness certificate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.