चंचूपात्र नाडीवर, डोळा खिशावर

By admin | Published: May 30, 2014 11:18 PM2014-05-30T23:18:48+5:302014-05-30T23:18:48+5:30

प्रयोगशाळेत वापरल्या जाणार्‍या चंचूपात्रात एक विशिष्ट प्रकारचे द्रावण घेऊन त्या माध्यमातून शरीरातील हालचाली दर्शविणे, मग, आजाराचे निदान करणे इतकेच नव्हे तर आजार पूर्णत: बरा झाल्यावरच फी द्या,

On the pendulum, on the eye pocket | चंचूपात्र नाडीवर, डोळा खिशावर

चंचूपात्र नाडीवर, डोळा खिशावर

Next

गॅरंटीचा दावा : भोंदू वैद्यांकरवी राजरोस लूट, अप्रमाणित औषधींचा पुरवठा
इंदल चव्हाण - अमरावती
प्रयोगशाळेत वापरल्या जाणार्‍या चंचूपात्रात एक विशिष्ट प्रकारचे द्रावण घेऊन त्या माध्यमातून शरीरातील हालचाली दर्शविणे, मग, आजाराचे निदान करणे इतकेच नव्हे तर आजार पूर्णत: बरा झाल्यावरच फी द्या, असे विश्‍वासदर्शक आमिष देऊन गोरगरीब व निरक्षर नागरिकांची लूट करण्याचे प्रकार  ग्रामीण भागात तळ ठोकून बसलेल्या बोगस वैदुंकडून सर्रास सुरू आहेत.लोकमतने नांदगाव खंडेश्‍वर तालुक्यातील मांजरी म्हसला या गावी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये नुकताच उघडकीस आला. 
दिवसेंदिवस आजारांचे प्रकार वाढत आहेत. उपचार करूनही आजार बरे होत नसल्याने आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या बेजार झालेले रुग्ण  तोतया डॉक्टरांच्या आमिषाला बळी पडतात. हे तोतया डॉक्टर आजार बरा झाल्यावरच पैसे द्या,असे छातीठोकपणे सांगत असल्याने हैराण झालेल्या रूग्णांचा त्यांच्यावर विश्‍वास बसतो. वैदूंनी रूग्णांची तपासणी करण्यासाठी नवाच फंडा शोधून काढला आहे. चंचूपात्रात एक द्रावण भरून ते मनगटाच्या नाडीवर ठेवायचे आणि त्यामुळे द्रावणात होणार्‍या चढउतारांवरून आजाराचे निदान करायचे, अशी पध्दत या वैदुंची आहे.
प्रत्यक्ष डोळ्यांनी चंचूपात्रातील द्रावणात होणारे चढ-उतार पाहून रूग्णांचा चटकन् वैदूंवर विश्‍वास बसतो. अनेकदा रुग्ण भावनिक होतात व वैदूंनी दिलेल्या औषधोपचारांवर त्यांचा विश्‍वास बसतो. धावपळीचे जीवनमान, पर्यावरणाचे ढासळते संतुलन, व्यसने आदींमुळे विविध आजार बळावू लागले आहेत. असाध्य आजारांसाठी डॉक्टरांचे उंबरठे झिजवणे सुरू होते. मात्र, कायमस्वरूपी ईलाज होत नाही. त्यामुळे लोक तोतया डॉक्टरांना बळी पडतात.

Web Title: On the pendulum, on the eye pocket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.