शिपाई भत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:39 AM2020-12-17T04:39:11+5:302020-12-17T04:39:11+5:30
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची मागणी मोर्शी : चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठी शिपाई भत्ता लागू करणारा ११ डिसेंबरचा शासननिर्णय रद्द करण्याची विदर्भ ...
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची मागणी
मोर्शी : चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठी शिपाई भत्ता लागू करणारा ११ डिसेंबरचा शासननिर्णय रद्द करण्याची विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय अध्यक्ष एस.जी. बरडे व सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांनी एका लेखी निवेदनाद्वारे राज्य शासनाकडे केला आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या ११ डिसेंबर २०२० च्या शासननिर्णयान्वये राज्यातील सर्व खासगी अनुदानित व अंशतः अनुदानित माध्यमिक/उच्च माध्यमिक शाळांमधील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठी ठोक स्वरूपात प्रतिशाळा शिपाई भत्ता लागू करण्यात आला आहे. अशाप्रकारे कंत्राटी पद्धतीने चतुर्थश्रेणी कर्मचारी नेमणे म्हणजे बहुजन, बेरोजगार, आर्थिक दुर्बल घटक याची क्रूर थट्टा आहे. हा शासननिर्णय त्वरित रद्द करावा, अन्यथा विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही देण्यात आला आहे.