संपर्कातील व्यक्तींना होते लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 12:06 AM2017-08-05T00:06:48+5:302017-08-05T00:07:09+5:30
घोड्याला लागण होणाºया ‘ग्लँडर्स’चा फटका मानवालाही बसू शकतो. भारताव्यतिरिक्त सन २००० मध्ये अमेरिकेत मानवाला ‘ग्लँडर्स’चा संसर्ग झाल्याची नोंद आहे.
अमरावती : घोड्याला लागण होणाºया ‘ग्लँडर्स’चा फटका मानवालाही बसू शकतो. भारताव्यतिरिक्त सन २००० मध्ये अमेरिकेत मानवाला ‘ग्लँडर्स’चा संसर्ग झाल्याची नोंद आहे. तर महाराष्टÑ, उत्तरप्रदेश, गुजरात, श्रीनगर, हिमाचल व हरियाणा राज्यात घोड्याला ‘ग्लँडर्स’ची सर्वाधिक बाधा झाल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदविले आहे. यारोगावर कोणतेच औषध उपलब्ध नसल्याने रोगाचा संसर्ग रोखण्यासाठी अश्ववर्गिय प्राण्यांची तपासणी करून मानवी आरोग्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना करणे, एवढेच हातात आहे.
हा संसर्ग बाधित घोड्याच्या सतत संपर्कात येणाºया मनुष्यांसह प्रयोगशाळेत काम करणाºया कामगार आणि विटभट्टी कामगारांना होतो. ‘ग्लँडर्स’बाधित घोड्यासह अन्य अश्ववर्गिय प्राण्यांमध्ये आढळणारी लक्षणे बाधित मानवातही आढळून येतात. हा आजार प्रामुख्याने श्वसनसंस्थेशी निगडित असल्याने सेप्टिसेमियाची लक्षणे दिसतात तर काही बाधितांमध्ये फुफ्फुसाच्या संक्रमणाची लक्षणे आढळतात. फुफ्फुसाशी निगडित न्युमोनिया आणि त्वचेवर अत्यंत वेगाने येणारे फोड आणि त्यातून विशिष्ट प्रकारचा घाणेरडा स्त्राव मानवामध्ये आढळून आला आहे. त्वचा, यकृत आणि मांसपेशीमध्ये बहुसंख्य गाठी येत असल्याने त्याचा संसर्ग अत्यंत वेगाने होतो. यावरील उपचार अतिशय महागडा आणि दीर्घ मुदतीचा असल्याने बाधितांवर उपचार करण्यापेक्षा त्याचेपासून इतरांना होणारा संसर्ग रोखण्यासाठी सन १८९९ पासून घोडयाला ‘शूट’ करण्याचा प्रघात इंग्रजांनी पाडला. त्यात आता बदल करून पशुसंवर्धन आयुक्तांच्या परवानगीने घोडा तथा अन्य अश्ववर्गिय बाधित प्राण्याला वेदनारहित मृत्यू दिला जातो. सन १८९९ पासून याआजारावर नियंत्रण मिळािवण्यासाठी लस शोधण्याचे प्रयत्न आणि संशोधन झाले असले तरी त्यावर लस किंवा प्रतिबंधात्मक औषध शोधण्यात संशोधकांना यश आलेले नाही. त्यामुळेच ‘ग्लँडर्स’बाधित घोड्याचा संसर्ग मानवाला झाल्यास त्यालाही मारण्याशिवाय पर्याय नाही, हे स्पष्ट आहे. तरीही बाधित मानवाला वेदनारहित मृत्यू देण्याची प्रक्रिया आक्षेपार्ह असल्याने त्यावर कुणीही खुलेआम बोलत नाही. यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक अरुण राऊत यांच्याशी संपर्क साधला असता ग्लँडर्सबाबत आपल्याला कुठलीही कल्पना नसल्याचे त्यांनी नम्रपणे सांगीतले. तर तज्ज्ञ डॉक्टरांकडून ग्लँडर्सच्या संसर्गाबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याकडेसुद्धा खात्रीलायक माहिती नव्हती. अनेक वैद्यकीय तज्ज्ञांनी आपल्याला या बाबत माहिती नसल्याचे सांगीतले.