अपंग व्यक्ती झिजवितो समाजकल्याणच्या पायऱ्या
By Admin | Published: April 24, 2016 12:08 AM2016-04-24T00:08:58+5:302016-04-24T00:08:58+5:30
अपंग व्यक्तींच्या स्वयंरोजगारासाठी बिजभांडवल योजने अंतर्गत चांदूर बाजार येथील एक दिव्यांगाना समाजकल्याण ...
बँकेची मनमानी : कर्ज मंजूर असतानाही दोन वर्षांपासून पायपीट
अमरावती : अपंग व्यक्तींच्या स्वयंरोजगारासाठी बिजभांडवल योजने अंतर्गत चांदूर बाजार येथील एक दिव्यांगाना समाजकल्याण विभाग अमरावती यांनी १ लक्ष रुपये कर्ज मंजूर केले व तसे पत्र स्टेट बँक आॅफ इंडीया, शाखा चांदूर बाजारला दिली परंतू या योजने अंतर्गत शासनाचे २० टक्के अनुदान बँकेत जमाच न झाल्यामुळे दोन वर्षांपासून एका अपंग व्यक्तिला बँकेच्या व समाजकल्याण विभागाच्या पायऱ्या झिजवाची वेळ आली आहे.
कलीमोद्दीन अलीमोद्दीन ईनामदार असे सदर दिव्यांगाचे नाव असून ते चांदूरबाजार तालुक्यातील खराळा येथील रहिवासी आहे. चश्मे आॅप्टीकलचे दूकान टाकण्यांसाठी त्यांना समाजकल्याणने १ लक्ष रुपयांचे सन २०१४ मध्ये मंजूर केले पण शासनाच्या वतीने समाजकल्याण विभागामार्फत २० टक्के अनुदान स्टेट बँक आॅफ इंडिया शाखा चांदूरबाजार येथे जमा करणे अपेक्षित होते. पण गेल्या दोन वर्षांपासून हि सबसिडी जमा न झाल्याने शरीराने ७० टक्के दिव्यांग असलेल्या युवकाला कार्यालयात येरझारा माराव्या लागत आहे.
समाजकल्याण विभागाच्या वतीने जिल्हा समाज कल्याण अधिकारी जि.प.यांनी १ जून २०१५ रोजी स्टेट बँक शाखा व्यवस्थापकाला पत्र पाठवून शासनाचे अनूदान प्राप्त झाले नाही. प्राप्त झाल्यावर आपल्या बँकेत जमा करतो. आपण स्थरावर कर्ज वाटप करावा असा जावाई शोध लावला त्यामुळे बँकेच्या तत्कालीन शाखा व्यवस्थापकाने फारशे हे प्रकरण गांभिर्याने न घेता. त्या अपंगाला अनेक वेळा टाकण्यांचा प्रयत्न केला व हीच परिस्थिती त्यांनी समाजकल्याण विभागातही अनूभवली त्यामुळे एकीकडे शासन अपं, व्यक्तींकरिता कोट्यवधी रुपयांच्या योजना आणते दुसरीकडे नियमे दाखवू अधिकरी दिव्यांगांची भट्टा करतात हा प्रकार थांबवावा व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन त्या थकलेल्या अपंग व्यक्तिंना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)