जनआक्रोश मोर्चासाठी जिल्हा काँग्रेसने कसली कंबर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 12:05 AM2017-12-04T00:05:27+5:302017-12-04T00:05:47+5:30
केंद्र व राज्यातील भाजप सरकारने तीन वर्षाच्या कार्यकाळात शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्यांना न्याय देण्याऐवजी अन्यायकारक निर्णय घेतले. त्यामुळे भाजप सरकार विरोधात जनतेत तीव्र जनआक्रोश निर्माण झाला आहे.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : केंद्र व राज्यातील भाजप सरकारने तीन वर्षाच्या कार्यकाळात शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्यांना न्याय देण्याऐवजी अन्यायकारक निर्णय घेतले. त्यामुळे भाजप सरकार विरोधात जनतेत तीव्र जनआक्रोश निर्माण झाला आहे.
भाजप सरकारच्या जनहितविरोधी धोरणाचा जाब विचारण्यासाठी येत्या १२ डिसेंबर रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात काँग्रेसच्यावतीने दीक्षाभूमीपासून विधिमंडळापर्यंत जनआक्रोश मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी ३ डिसेंबर रोजी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा व तालुका पदाधिकाºयांची बैठक बोलवली होती. जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला आमदार वीरेंद्र जगताप, माजी आमदार केवलराम काळे, झेडपीचे सभापती जयंत देशमुख आदी उपस्थित होते. यावेळी बबलू देशमुख यांनी भाजप सरकारचा चांगलाच समाचार घेत शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्यांवर अन्याकारक धोरण राबविले. परिणामी जनतेत भाजप सरकारविरुद्ध रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेसच्यावतीने हिवाळी अधिवेशनावर जनआक्रोश मोर्चा धडकणार आहे. या मोर्चाच्या नियोजन व सहभागाबाबत पदाधिकाºयांना महत्त्वाच्या सूचना पदाधिकाºयांनी कार्यकर्त्यासह सहभागी होण्याचे आवाहन बबलू देशमुख यांनी केले. सभेला आ. वीरेंद्र जगताप यांनी मार्गदर्शन केले. मोर्चात अ.भा. काँग्रसेचे नेते गुलाबनबी आझाद व अनेक नेते सहभागी होणार असून कार्यकर्त्यांनी हातात काँग्रेस झेंडे घेऊन सहभागी व्हावे असे आवाहन केले. सभेचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी, तर आभार प्रदर्शन जयंत देशमुख यांनी केले. सभेला भैय्यासाहेब मेटकर, प्रकाश काळबांडे, मनोज देशमुख, राजेंद गोरले, बाळासाहेब हिंगणीकर, महेद्रसिंग गैहलवार, सुभाष पाथरे आदी उपस्थित होते.
काँग्रेस पक्षातर्फे शेतकरी शेतमजूर व सर्वसामान्यांमध्ये भाजप सरकारविरोधात रोष वाढला आहे. फसवी कर्जमाफी व अन्य प्रश्नामुळे शेतकरी संकटात आहे. यासह इतर प्रश्नांसाठी अधिवेशनावर जनआक्रोश मोर्चा काढला जाणार आहे.
- बबलू देशमुख, जिल्हाध्यक्ष जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमेटी