आडजात वृक्ष कटाईला चोरीछुपी परवानगी ?

By admin | Published: May 15, 2017 12:05 AM2017-05-15T00:05:23+5:302017-05-15T00:05:23+5:30

आडजात वृक्षकटाईला वरिष्ठ अधिकाऱ्यांची नकारघंटा असताना संबंधित वनाधिकाऱ्यांनी मात्र उपवनसंरक्षकांना अंधारात ठेऊन आडजात वृक्ष कटाईला परवानगी दिल्याची विश्वसनीय माहिती आहे.

Permission to cut tree trunks? | आडजात वृक्ष कटाईला चोरीछुपी परवानगी ?

आडजात वृक्ष कटाईला चोरीछुपी परवानगी ?

Next

उपवनसंरक्षक अंधारात : यवतमाळ, चांदूर, परतवाड्याहून वाहतूक
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : आडजात वृक्षकटाईला वरिष्ठ अधिकाऱ्यांची नकारघंटा असताना संबंधित वनाधिकाऱ्यांनी मात्र उपवनसंरक्षकांना अंधारात ठेऊन आडजात वृक्ष कटाईला परवानगी दिल्याची विश्वसनीय माहिती आहे. त्यामुळे यवतमाळ, चांदूररेल्वे आणि परतवाडा मार्गावरून अमरावती शहरात आडजात लाकूड वाहून नेणारी वाहने राजरोसपणे येत आहेत. आडजात वृक्ष कटाईला चोरीछुपे परवानगी देणारे ते वनाधिकारी कोण, हे शोधून काढणे वनविभागाला गरजेचे झाले आहे.
मागील काही वर्षांपासून जिल्ह्यात आडजात वृक्ष कटाईला वरिष्ठांनी ‘ब्रेक’ लावला आहे. त्यानुसार वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी तसे आदेशही निर्गमित केले आहेत. मात्र, वनपरिक्षेत्राधिकारी, वनपाल दर्जाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात

वृक्ष कटाईसाठी अर्थव्यवहार निश्चित
अमरावती : परस्पर आडजात वृक्ष कटाईला परवानगी दिली आहे. त्यामुळे आडजात लाकडाची वाहतूक वाढली आहे. आडजात वृक्ष कटाईचे लाकूड थेट आरागिरणीमध्ये न आणता ते बेवारस ठेवले जाते. त्यानंतर प्रसंगानुसार हे आडजात लाकूड आरागिरणीत फस्त केले जाते. परतवाडा, मोर्शी, वरुड, अंजनगाव सुर्जी, चांदूरबाजार, चांदूररेल्वे, वडाळी वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांनी मागील १५ दिवसांपासून आडजात वृक्ष कटाईला परवानगी दिली आहे. हा प्रकार अमरावतीचे उपवनसंरक्षक हेमंत मीना यांना अंधारात ठेऊन करण्यात आला आहे. आडजात वृक्ष कटाईला परवानगी मिळावी, यासाठी अमरावती येथील एका लाकूड तस्कराने पुढाकार घेतल्याची माहिती आहे. वनपरिक्षेत्राधिकारी, आरागिरणी वनपाल आडजात वृक्ष कटाईप्रकरणी त्यांना द्यावयाची रक्कम यासाठी व्यवहार निश्चित झाले आहेत. जून २०१५ पर्यंत जंगलात आडजात वृक्ष कटाईचे व्यवहार आरागिरणी संचालकांनी संबंधित वनाधिकाऱ्यांकडून रितसर केले आहेत.
त्यामुळे आडजात वृक्षांचे लाकूड शहरासह जिल्हाभरात आणले जात आहे. यवतमाळ मार्गावरून कडूनिंब, आंबा, कविठ, महारूख, शिवर, जांभूळ, औदुंबर आदी आडजात प्रजातीच्या झाडांची कत्तल करून लाकूड आणले जात आहे. एकिकडे पावसाळ्यात लाकडाची टंचाई भासू नये, यासाठी आतापासूनच आरागिरणी संचालकांनी वनाधिकाऱ्यांना आमिष दाखवून हिरवेगार वृक्ष संपविण्याचा घाट रचला आहे. आरागिरणी संचालकांनी आडजात वृक्ष कटाईचे व्यवहार केले आहेत. त्यानुसार वाहनांद्वारे लाकूड आणले जात आहे. मात्र, आरागिरणी हे लाकूड आणण्यापूर्वी ते दोन-चार दिवस बेवारस ठेवण्याची शक्कल लढविली जाते. हा प्रकार सबंधित वनाधिकाऱ्यांना माहित असताना ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ असा वनविभागाचा कारभार सुरु आहे. आडजात वृक्षतोडीबाबत अमरावतीचे उपवनसंरक्षक हेमंत मीना यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.
आडजात वृक्षालाच आग लावण्याचा घटना : आडजात वृक्षाला आग लाऊन ते पाडण्याच्या घटना लाकूड तस्करांकडून केल्या जात आहेत. चांदूरबाजार, परतवाडा मार्गावर आडजात प्रजातीच्या वृक्षाच्या बुध्यांशी आग लाऊन ते खिळखिळे केले जातात. रात्रीच्यावेळी या झाडांचे लाकूड आरागिरणीत आणून फस्त करण्याचा प्रकार नियमितपणे सुरु आहे. यामुळे राज्य व राष्ट्रीय महामार्गालगतचे हिरवे वृक्ष नामशेष होत आहेत.

अवैध वृक्ष कटाईचे लाकूड ठेवले जाते बेवारस
लाकूड तस्करांकडून आडजात वृक्षांचे अवैध लाकूड आणल्यास ते थेट आरागिरणीत न ठेवता वाहनांद्वारे आणून हे लाकूड हे नदी, नाले, धार्मिक स्थळे, खुली जागा, भूखंड, शाळेचे आवार आदी ठिकाणी बेवारसपणे ठेवले जाते. बेवारस लाकूड वनाधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले तरी आरागिरणी संचालकांविरुद्ध वनगुन्हे दाखल करता येत नसले तरी या बेवारस लाकडावर आरागिरणी मालकांची नजर असते, हे विशेष. अद्यापही रात्रीच्यावेळी अवैध लाकडांची वाहतूक सुरु असल्याची माहिती आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडे अवैध वृक्ष तोडीसंदर्भात तक्रार नोंदविण्यात आली आहे. जंगलात गवत पेटविण्याच्या नावाखाली हिरवेगार वृक्ष संपविण्याचे षडयंत्र रचले जात आहे. अवैध वृक्षतोडीत सहभागी असलेल्यांना शोधून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई व्हावी.
- नीलेश कंचनपुरे, अध्यक्ष, पोहरा जंगल बचाव कृती समिती.

Web Title: Permission to cut tree trunks?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.