मिळकत खरेदी विक्री, दस्त नोंदणीला परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:13 AM2021-05-21T04:13:51+5:302021-05-21T04:13:51+5:30
अमरावती : सह दुय्यम निबंधकाकडील मालमत्तेबाबतचे खरेदी विक्री व्यवहार, दस्त नोंदणी करण्यास परवानगी देणारा आदेश जिल्हाधिकारी शैलेश ...
अमरावती : सह दुय्यम निबंधकाकडील मालमत्तेबाबतचे खरेदी विक्री व्यवहार, दस्त नोंदणी करण्यास परवानगी देणारा आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज जारी केला.
आदेशानुसार, सह दुय्यम निबंधक कार्यालयाकडे ऑनलाईन नोंदणी केलेल्या व्यक्तींचे खरेदी विक्री व्यवहार करता येतील. इंटरनेटच्या माध्यमातून दस्त नोंदणीसाठी टोकन आरक्षण करून पूर्वनियोजित दिवशी व वेळेनुसार दस्त नोंदणी करण्याची सुविधा ठेवावी. टोकन क्रमांकानुसारच संबंधितांना कार्यालयात प्रवेश द्यावा. गर्दी होणार नाही यासाठी स्वतंत्र वेळा निश्चित करून नियोजन करावे. दररोज खरेदी विक्री, दस्त नोंदणी करताना एका कार्यालयात सरासरी १० ते १२ व्यवहार व्हावेत व त्यासाठी टोकन सिस्टीम वापरण्याचे आदेश आहेत.
कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र हवे
खरेदी विक्री व्यवहारात उपस्थित राहणाऱ्या दोन्ही पक्षाच्या व्यक्तींकडे आरटीपीसीआर किंवा रॅपिड अँटिजेंन टेस्टचा निगेटिव्ह अहवाल असणे आवश्यक आहे. कार्यालयात व्यक्ती-व्यक्तींत सुरक्षित अंतर, सॅनिटायजर, मास्क आदी दक्षता उपायांचा काटेकोर अवलंब व्हावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.