परप्रांतीय ‘टर्की’ विक्रीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 10:54 PM2018-12-31T22:54:13+5:302018-12-31T22:54:48+5:30
दिसायला लांडोरसारखा ‘टर्की’ नावाचा पक्षी हजारोंच्या संख्येत थर्टीफर्स्टच्या मुहूर्तावर बडनेऱ्यात मोठ्या संख्येत विक्रीसाठी आणले आहेत. केरळमध्ये याची मोठ्या प्रमाणात पैदास होते. मात्र, हा पक्षी रोगीट असल्यास तेवढाच घातक ठरू शकतो, असे जाणकारांचे मत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : दिसायला लांडोरसारखा ‘टर्की’ नावाचा पक्षी हजारोंच्या संख्येत थर्टीफर्स्टच्या मुहूर्तावर बडनेऱ्यात मोठ्या संख्येत विक्रीसाठी आणले आहेत. केरळमध्ये याची मोठ्या प्रमाणात पैदास होते. मात्र, हा पक्षी रोगीट असल्यास तेवढाच घातक ठरू शकतो, असे जाणकारांचे मत आहे.
जुन्यावस्तीतील पशुवैद्यकीय दवाखान्यासमोरील खुल्या जागेत हजारो ‘टर्की’ विक्रीसाठी आले आहे. त्याठिकाणी खरेदी करणारे आणि बघ्यांची मोठी गर्दी होत आहे. हे पक्षी ट्रकने हैद्राबाद येथून आणण्यात आले. ज्यांनी हे पक्षी आणले ते या पक्षाला चिनी कोंबड्या या नावाने संबोधित आहे. नर व मादी अशा दोन्ही प्रकारात हे पक्षी विकले जात आहे. बडनेरा शहरात ते पहिल्यांदाच विक्रीसाठी आल्याने नाविण्यपूर्ण कोंबड्या पाहून बघ्याची एकच गर्दी उसळत आहे. महामार्गालगतच हे पक्षी ठेवण्यात आल्याने बघणाऱ्यांच्या गाड्या महामार्गावरच उभ्या राहत आहे. त्यामुळे वाहतुकीला देखील खोळंबा होत आहे. हा पक्षी मुंबईत सुद्धा मोठ्या प्रमाणात आढळून येतो. या पक्षाची वैद्यकीय तपासणी करूनच त्याला वापरता येते अन्यथा ते घातक ठरू शकते, असे यातील पक्षी जाणकारांचे म्हणणे आहे.
बडनेºयात विक्रीसाठी आलेल्या या पक्षी विक्रेत्यांकडे विक्रीचा परवाना आहे किंवा नाही? हे देखील पशूसंवर्धन विभागाने जाणून घेतले महत्वाचे आहे. ‘टर्की’ पक्षाचे मांस हे खाण्यास योग्य की अयोग्य, हे आरोग्यदृष्ट्या तपासणी होणे नितांत गरजेचे आहे. या पक्षामुळे शहराला रोगराई ग्रासणार तर नाही, याची खबरदारी महापालिका पशू वैद्यकीय विभागाने घेणे महत्वाचे आहे.
निरोगीपणाची खात्री कोण देणार?
हैद्राबाद येथून ट्रकद्वारे हजारो ‘टर्की’ विक्रीसाठी आणले. थर्टी फस्टच्या निमित्त्याने परप्रातीयांनी बाजार थाटला. मात्र, या पक्षाच्या निरोगीपणाची कुठलीही खातरजमा झाली नाही. पशू वैद्यकीय विभागाने याची दखल देखील घेतली नाही. तसेच या विभागाचे प्रमाणपत्र या विक्रे त्यांकडे नाही. त्यामुळे हे ‘टर्की’ जर आजारी किंवा संसर्गजन्य रोगाची लागण झालेली असल्यास खवैय्यासाठी ते घातक ठरणारे आहे. या विक्रेत्यांचे चौकशी करून ओळख, निवासी पत्ता आदी बाबी तपासून घेणे गरजेचे झाले आहे.
ेहा टर्की नावाचा पक्षी आहे. केरळमध्ये याची सर्वाधिक पैदास आहे. त्याची वैद्यकीय तपासणी करूनच मांस खाण्यास वापरता येईल. अन्यथा ते घातक ठरेल.
- डॉ. विजय रहाटे,
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी.