कीटकनाशक सुरक्षित फवारणीचे यंत्र विकसित, मृत्यूचा धोका टळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 06:08 PM2018-12-26T18:08:25+5:302018-12-26T18:08:32+5:30
कीटकनाशक फवारणीतून विषबाधा होऊन दगावण्याच्या बऱ्याच घटना विदर्भात घडल्या आहेत.
- इंदल चव्हाण
अमरावती : कीटकनाशक फवारणीतून विषबाधा होऊन दगावण्याच्या बऱ्याच घटना विदर्भात घडल्या आहेत. नवतंत्रज्ञामुळे आता सर्वसामान्य शेतकरीही या यंत्राचा वापर करू शकणार असल्याने सुरक्षित फवारणीचा प्रयोग यशस्वी होऊन मृत्यूचा धोका टळणार, असे 'मल्टी नोझन अॅग्रो स्प्रेअर' प्रो. राम मेघे जुने इंजिनीअरिंग कॉलेजच्या भाग ३ चे टॉम-१ चे विद्यार्थी अथर्व उमक आणि चैतन्य इंझाळकर यांनी तयार केले आहे.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत आविष्कार - २०१८ स्पर्धा बुधवारपासून सुरू झाली, ती गुरुवारी संपणार असून, यामध्ये विविध जिल्ह्यांतील महाविद्यालयांतर्गत विद्यार्थ्यांनी आधुनिक तंतत्रज्ञानाचा उपयोग आपल्या जीवनात कसा सार्थकी लागेल, याविषयी प्रतिकृतीचे सादरीकरण करण्यात आले. त्यात शेतकºयांना कमी खर्चात, कमी श्रमात अधिक काम होऊन अधिक उत्पन्न मिळण्यास मदत होण्याच्या उद्देशाने मल्टी रोटेड अॅग्रो स्पेअर यंत्र ठेवण्यात आले होते. हे यंत्र सामान्यांतील सामान्य शेतकरी आपल्या सोयीनुसार वापरू शकतो. त्यामुळे आर्थिक खर्चातही बचत होणार आणि मजुराचीदेखील आवश्यक भासणार नाही, अशी या यंत्राची वैशिष्ट्य आहे.
असे आहे यंत्र
या फवारणी यंत्रासाठी सायकलीचे चेचीस, समोरील चाक, मागे लहान चाक, चीनचाकी सायकलीची हातात पकण्यासाठी मुठ, त्यालाच जोडलेली स्प्रे पंपाची हातात पंपिंग होणारी मुठ, त्याला सुरक्षित गार्ड (नाका-तोंडासह डोळ्यात औषधीचे फवारे जाऊ नये) पारदर्शक राहील. मोठी व लहान फिरव्हिल, त्यावर सायकलीची चेन, आठ एमएमच्या लोखंडी पट्ट्या, आठ एमएमचेच नट-बोल्ट, अँगलवर प्लास्टिकची स्प्रे पंपाची टाकी अशी या यंत्राची रचना आहे.
चार हजार रुपयांचं यंत्र घरी
हे यंत्र तयार करण्यासाठी किमान चार हजार रुपये खर्च येतो. मात्र, एकदा तयार झाल्यानंतर योग्य पद्धतीने वापर केल्यास ते ५ ते ७ वर्षे सहज चालते. या यंत्रामुळे मजुराचे श्रम वाचणार आहे. खांद्यावर २५ लिटरची टाकी घेऊन केवळ एकाच नोझलने फवारणी करताना अधिक वेळ व त्रासदेखील होतो. परंतु, या यंत्राने मजुराचा त्रास वाचतो. एकाच फेरीत एक ओळीची फवारणी शक्य होते. पीक मोठे झाल्यास नोझल अॅडजेस्टमेंटची सुविधा यात केलेली आहे. त्यामुळे हे यंत्र सामान्य शेतकरी सहज वापरू शकतो.
यंत्राची संपूर्ण माहिती जाणून घेतली. हे यंत्र सामान्य शेतकरीसुद्धा सहज वापरात आणू शकतो. यापासून कीटकनाशक औषधीची बाधा होणार नाही, खांद्याला इजा होणार नाही, अंगावर औषधी सांडणार नाही, अशी रचना यात विद्यार्थ्यांनी साकारली आहे.
- मुरलीधर चांदेकर, कुलगुरु, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ