पेट्रोल, डीझेल, गॅस दरवाढीने मोडले सर्व सामान्यांचे कंबरडे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:17 AM2021-06-16T04:17:52+5:302021-06-16T04:17:52+5:30
वरूड :- पेट्रोल, डीझेल, गॅस मध्ये सातत्याने होणारी दरवाढ हि सर्वसामान्यांना न परवडणारी आहे . महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे ...
वरूड :- पेट्रोल, डीझेल, गॅस मध्ये सातत्याने होणारी दरवाढ हि सर्वसामान्यांना न परवडणारी आहे . महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून अनेक कुटुंबे अर्धपोटीच राहून जीवन व्यतीत करीत आहे . महागाईने त्रस्त झालेल्या गोरगरीब, कष्टकरी सर्वसामान्य नागरिकांना एक दिवसाच्या मजुरीत केवळ तेलच खरेदी होते तर उर्वरित जीवनाश्यक वस्तू कश्या खरेदी कराव्या हा प्रश्न गोरगरिबांना पडला आहे . यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने महागाई कमी करण्याची मागणी केल्या जात आहे .
अच्छे दिन चे स्वप्न दाखवणा-या केंद्र सरकारच्या ध्येय-धोरणांनामुळे जनता त्रस्त झाली आहे. दोन वर्षांपासून पेट्रोल, डीझेलच्या किमती दिवसागणिक वाढत असल्याने शंभरी लाही शेंडी फोडली तर घरगुती गॅस च्या दरात सुद्धा मोठी वाढ करून अनुदानाची रक्कम कमी केली .
यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह, शेतकरी, शेतमजूर यांच्या खिशाला कात्री लागत आहे . पेट्रोल, डीझेल, गॅस मध्ये सातत्याने होणारी दरवाढ हि सर्वसामान्यांना न परवडणारी आहे . महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून अनेक कुटुंबे अर्धपोटीच राहून जीवन व्यतीत करीत आहे .. महागाईने त्रस्त झालेल्या गोरगरीब, कष्टकरी सर्वसामान्य नागरिकांना एक दिवसाच्या १०० ते २०० रुपये मोलमजुरीत केवळ १४० ते १५० रुपये लिटर चे तेलच खरेदी होते तर उर्वरित जीवनाश्यक वस्तू कश्या खरेदी कराव्या हा प्रश्न गोरगरिबांना पडला आहे .प्रत्येकाच्या बँक खात्याला १५ लाख रुपये देणारे सरकार रकुठे गेले हा प्रश्न पडला असून महागाईच्या भस्मासुरामुळे गोरगरिबांची मारावे कि जगावे हा प्रश्न पडला आहे .. एकीकडे हाताला काम तर दुसरीकडे पोट कसे भरावे हा प्रश्न असल्याने सर्वसामान्य नागरिकत्रस्त झाला आहे . पालेभाज्या सुद्धा ४० ते ६० रुपये किलो , डाळ १२० ते १४० रुपये किलो , शेंगदाणा ते २०० रुपये लिटर अश्या एक ना वस्तू महागल्या आहे . वाहतूकदारमध्ये सुद्धा हाच प्रश्न असून डिझेल ९० रुपये तर पेट्रोल १०४ रुपये असल्याने प्रवासा सह मालवाहतूकदारांनी दर वाढविले . याचा परिणाम सर्वसामान्य कुटुंबाना पडायला लागला आहे . परंतु केंद्र आणि राज्य सरकारचे याकडे दुर्लक्ष असून केवळ राजकीय पोळी शिकण्याचे प्रकार सुरु आहे . यामुळे लोकांनी निवडून दिलेले खासदार , आमदार , विरोधी पक्ष सुद्धा गप्प असून केवळ देखावा करणारे नाममात्र आंदोलन करून प्रसिद्धी करवून नागरिकांची दिशाभूल केल्या जाते . मात्र सर्व एकाच माळेचे मणी असून सत्तेची मुक्ताफळे चाखण्याकरिता मतदारांचा वापर करणे एवढाच उद्देश असल्याने सर्वसामान्य नागरिक या महागाईच्या भस्मासुराने त्रस्त झाला आहे .
* कुठे गेले विरोधक , नागरिकांचा सवाल ! .
पूर्वी विरोधक सत्ताधार्यांना वठणीवर आणण्याकरिता नांदोलने मोर्चे काढून महागाईपासून तर विविध प्रश्नावर आंदोलन करीत होते . मात्र स्वस्वार्थ जडल्याने प्रत्येक जण खुर्चीच्या मागे लागला आहे , विकासकामात भ्रष्टचा रवाढला असून निकृष्ट कामे उत्कृष्ट दाखविण्याचे प्रकार सुरु असतात . केवळ मतदारनचा छळ सुरु आहे . महागाईसह अनेक सार्वजनिक प्रश्नावर बोलण्यास कोणीही तयार होत नाही हि सर्वसामान्यांची शोकांतिका आहे . अलीकडे सेटिंग आंदोलनाचा प्रकार वाढीस लागला असल्याचे चित्र आहे . परंतु महागाई कोण कमी करणार विरोधक कि सत्ताधारी हा प्रश्न नागरिकांना पडला आहे .