पेट्रोलने गाठली शंभरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:11 AM2021-05-15T04:11:52+5:302021-05-15T04:11:52+5:30

कोरोना संसर्ग थांबविण्यासाठी शासनाने कडक लॉकडाऊनच्या माध्यमातून नागरिकांचा एकमेकांशी येणारा संपर्क खंडित करण्याचा प्रयत्न केला. जेणेकरून कोरोनाची साखळी तुटेल ...

Petrol reached hundreds | पेट्रोलने गाठली शंभरी

पेट्रोलने गाठली शंभरी

googlenewsNext

कोरोना संसर्ग थांबविण्यासाठी शासनाने कडक लॉकडाऊनच्या माध्यमातून नागरिकांचा एकमेकांशी येणारा संपर्क खंडित करण्याचा प्रयत्न केला. जेणेकरून कोरोनाची साखळी तुटेल व पॉझिटिव्हिटीचे प्रमाण वाढेल. पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक झाली तेव्हा पेट्रोलची दरवाढ झाली नाही. निवडणुकीच्या निकालानंतर प्रत्येक दिवशी २० ते ३० पैशांनी सतत वाढत गेल्याने शुक्रवारी १०० रुपये १० पैसे प्रतिलिटर दराने विक्री झाली. तर डिझेल ९१ रुपये ६० पैसे प्रतिलिटरने विक्री करण्यात आले. हे दर वरूनच ठरत असल्याने स्थानिकांची याच काही पॉलिसी नसल्याची प्रतिक्रिया संचालकांनी दिली.

बॉक्स

कोरोना पॉझिटिव्ह पोहचला प्रमाणपत्रासह

कडक लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवेतीलच वाहनधारकांना पेट्रोल देण्याची मुभा प्रशासनाने दिल्यामुळे विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारकांना पेट्रोल दिले जात नाही. त्यामुळे शहरातील एका पेट्रोलपंपावर चक्क कोरोना पॉझिटिव्हचे प्रमाणपत्र घेऊन पेट्रोलची मागणी केल्याचा प्रकार शुक्रवारी घडला. सदर व्यक्तीला वलगावकडे जायचे होते. मात्र, वाटेतच त्यांच्या वाहनातील पेट्रोल संपल्याने त्यांना पेट्रोल मिळेली की नाही, या भीतीने त्याने प्रमाणपत्रच सोबतच आणल्याचे सांगण्यात आले.

कोट

मार्च महिन्यात पेट्रोल ९८.८८, प्राईमचे दर १०१.७४ तर एप्रिल महिन्यात ९८.२९, प्राईमचे दर १०१.१५ रुपये होते. तसेच डिझेलचे मार्च महिन्यात ८९.९४, एप्रिलमध्ये ८९.३० आणि १४ मे रोजी पेट्रोल १००.१०, प्राईम १०२.९८ तर डिझेल ९१.६० रुपये दर राहिले.

- जयकांत अग्रवाल,

संचालक, भारत पेट्रोलियम, इर्विन चौक

Web Title: Petrol reached hundreds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.