पीएच.डी. कोर्स वर्क परीक्षा ऑनलाईन, ऑफलाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:12 AM2021-04-13T04:12:50+5:302021-04-13T04:12:50+5:30
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने पीएच.डी. कोर्स वर्क परीक्षा ऑनलाईन व ऑफलाईन अशाप्रकारे घेण्याचे नियोजन चालविले आहे. ऑफलाईन ...
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने पीएच.डी. कोर्स वर्क परीक्षा ऑनलाईन व ऑफलाईन अशाप्रकारे घेण्याचे नियोजन चालविले आहे. ऑफलाईन परीक्षांसाठी पाचही जिल्ह्यांत प्रत्येकी एक केंद्र असणार आहे.
कोराेना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पीएच.डी. कोर्स वर्क परीक्षा घेण्यात येणार आहे. व्यवस्थापन परिषदेच्या निर्णयानुसार नवसंशोधकांना ऑनलाईन व ऑफलाईंन अशा दोन्ही प्रकारच्या परीक्षांचे पर्याय दिले जाणार आहे. ज्या उमेदवारांकडे ऑनलाईन परीक्षांसाठी साधने नाहीत, अशांसाठी जिल्ह्यात एक परीक्षा केंद्र नेमण्यात येणार आहे. सुमारे १,१५० विद्यार्थ्यांसाठी पीएच.डी. कोर्स वर्क ही परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे. ऑनलाईन परीक्षा मोबाईल, लॅपटॉप, डेस्क टॉप आदी साधनांच्या आधारे देता येईल, असे विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.
------------------
ऑफलाईन परीक्षांसाठी हे असेल केंद्र
अमरावती : सिपना अभियांत्रिकी महाविद्यालय, बडनेरा मार्ग निंभोरा
यवतमाळ : जवाहरलालजी दर्डा अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय
वाशिम : आरे अभियांत्रिकी महाविद्यालय
अकोला : शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय
बुलडाणा : पंकज लद्दड अभियांत्रिकी महाविद्यालय