अचलपूरची फिनले मिल सुरू होणार फोटो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:11 AM2020-12-26T04:11:08+5:302020-12-26T04:11:08+5:30
अनिल कडू परतवाडा : कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने लॉकडाऊनमध्ये, मागील ९ महिन्यांपासून बंद असलेल्या अचलपूरच्या फिनले मिलला सुरु करण्यास वस्त्रोद्योग ...
अनिल कडू
परतवाडा : कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने लॉकडाऊनमध्ये, मागील ९ महिन्यांपासून बंद असलेल्या अचलपूरच्या फिनले मिलला सुरु करण्यास वस्त्रोद्योग मंत्रालयाने मान्यता दिली आहे. यात ३ महिने २१ दिवस चाललेल्या कामगारांच्या उपोषणाची शनिवारी, २६ डिसेंबरला सांगता होत आहे.
वस्त्रोद्योग मंत्रालयातर्गत राष्ट्रीय वस्त्रोद्योग मंडळाकडून देशपातळीवर २३ मिल कार्यान्वित आहेत. लॉकडाऊनपासून या सर्व मिल बंद आहेत. यात फिनलेचाही समावेश आहे. दरम्यान या २३ मिलपैकी तांत्रिकदृष्ट्या सक्षम व नफ्यात असलेल्या सहा मिल सुरू करण्याचा निर्णय क्रेंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्या नेतृत्वात घेण्यात आला आहे. तशी मान्यताही देण्यात आली आहे.
अचलूपरची फिनले मिलमधून उत्पादीत सुती कापड सर्वेातम दर्जाचे असून त्यास मोठ मागणी आहेण रेमन्डसह राजलक्ष्मीलाही फिनलेनी कापड तयार करुन पुरविले आहे. ही मिल सुरुवातील पासून नफ्यात आहेण फिनलेच्या या नफ्यातून विदर्भातील अकोला व हिंगणघाट स मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर मधील कापड मिलच्या कामगारांचे पगारए वेतन केल्या जात आहेत. अन्य बंद कापड मिलला फिनले आर्थिक हातभार लावत आहेत.
लॉकडाऊनमध्ये फिनले बंद पडल्यानंतर तेथील कामगारांच्या वेतनाचा प्रश्न उपस्थित झाला होता.
कामगारांना पूर्ण शंभर टक्के वेतन मिळावे, फिनले सुरू करण्यात यावी, या मागणीकरिता भारतीय मजदूर संघाशी संलग्न असलेल्या गिरणी कामगारसंघाच्या नेतृत्वात फिनलेच्या कामगारांनी ३ महिने २१ दिवसांपर्यंत, फिनले मिलच्या गेटसमोर उपोषण सुरू ठेवले. दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशीही कामगारांचे उपोषण सुरुच होते. दरम्यान कामगारांनी सामूहिक मुंडनही केले. दिवाळीचा बोनस मिळावा म्हणून अधिकाऱ्यांचा रस्ताही रोखला होता.
वस्त्रोद्योग मंत्रालयाने फिनले मिल सुरू करण्यास मान्यता दिल्यामुळे कामगारांसह कामगार नेते व त्यांचे पाठीराखे सुखावले आहेत. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस, चंद्रशेखर बावनकुळे, खासदार रामदासजी तडस, गोवर्धनजी शर्मा, अनिल बोंउे, शिवराय कुळकर्णी, श्रीकांत भारतीय, निवेदिता चौधरी, तृषार भारतीय, गजानन कोल्हे, अभय माथने, खासदार नवनीत राणा यांचे फिनले मिल सुरू व्हावी, या दृष्टीने केलेले प्रयत्न उल्लेखनिय ठरले. शनिवार २६ डिसेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता कामगार उपोषणाची सांगता करणार आहेत.
कोट
फिनले मिल सुरू करण्यास वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांनी मान्यता दिली आहे. शनिवार २६ डिसेंबरला चंद्रशेखर बावणकुळे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत ३ महिने २१ दिवस चाललेल्या कामगारांच्या उपोषणाची सांगता होत आहे.
- अभय माथने, अध्यक्ष, गिरणी कामगार संघ फिनले, अचलपूर