फोटो कॅप्शन, पावसाचा जिस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:11 AM2021-05-17T04:11:49+5:302021-05-17T04:11:49+5:30
--- अमरावती जिल्ह्याला वादळाचा तडाखा अमरावती : शहरात रविवारी दुपारी मान्सूनपूर्व वादळासह पावसाने चांगलाच तडाखा दिला. अनेक भागातील वृक्ष ...
---
अमरावती जिल्ह्याला वादळाचा तडाखा
अमरावती : शहरात रविवारी दुपारी मान्सूनपूर्व वादळासह पावसाने चांगलाच तडाखा दिला. अनेक भागातील वृक्ष उन्मळून पडले. त्याखाली कार दबल्या, काही भागातील टिनपत्रे उडाली,जाहिरातीचे फलके पडलीत, झाडांच्या फांद्यामुळे विद्युत तारा तुटल्या. अर्ध्याअधिक शहराचा वीजपुरवठा खंडीत झाला. सायंकाळपर्यत विजपुरवठा सुरळीत झालेला नव्हता. दरम्यान अचलपूर, चांदूर बाजार, चांदूर रेल्वे, वरूड, मोर्शी शहरासह तालुक्यांतील काही गावांमध्ये वादळी पाऊस झाला. अचलपूर तालुक्यातील मल्हारा व भूगाव येथे झाडे कोसळी, तर वरूडमध्ये सायंकाळी ६ वाजपासून वादळी पावसाला सुरुवात झाल्याने शहरी भागातील वीज प्रवाह खंडित झाला. काही झाडे कोसळली.
शहरात दुपारी एक पासून सुमारे ४५ मिनिटे वादळासह मान्सूनपूर्व पावसाने शहरात अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. कॅम्प परिसरात झाड पडल्याने त्याखाली कार दबली. राधानगरात देखील झाड पडल्याने कार दबल्याचे घटना घडली, सुदैवाने यात जीवतहानी झालेली नाही. याशिवाय पीडीएमएमसी मार्गावर फांद्या पडल्याने विद्युत तारा तुटल्या. रामपूरी कॅम्प भागात हिच स्थिती दिसून आली. याशिवाय शहरातल्या अनेक भागात झाडांच्या फांद्या तुटल्याने दिसून आले. सायंकाली उशीरापर्यत वीजपुरवठा सुरळीत झालेला नव्हता. पहिल्याच पावसाने महावितरणची पोलखोल केलेली आहे.